Tata Group | टाटाची शानदार कामगिरी ! ‘या’ कंपनीकडून मिळतोय एका वर्षात 180 % परतावा; यात राकेश झुनझुनवालाचीही अधिक गुंतवणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Tata Group | अनेकजण सध्या शेअर मार्केटकडे वळत आहे. गुंतवणूक (Investment) करण्यासाठी एक चांगला पर्याय म्हणून अधिक लोक शेअर मार्केटमध्ये (Stock market) उतरताना (Tata Group) दिसत आहेत. यामुळे अनेक वेगवेगळ्या कंपन्या देखील गुंतवणूकदारासांठी लाभदायक योजना अथवा परतावा देत आहे. तर, अशीच एक विशेष कंपनी म्हणजे टाटा ग्रुपचं नाव चर्चेत आहे. कोरोनाच्या महामारीत टाटाच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगले परतावेही दिलेत. विशेष म्हणजे टाटाच्या उत्तम कामगिरीमुळे राकेश झुणझुणवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी देखील यांच्या कंपन्यामधील गुंतवणूक वाढवलीय.

 

‘टाटा ग्रुपमधील (Tata Group) ऑटोमोबाइल क्षेत्रात कार्यरत असणारी ही आघाडीची कार निर्माता कंपनी म्हणजे टाटा मोटर्स (Tata Motors) आहे.
सध्या इलेक्ट्रॉनिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स सगळ्यात आघाडीवर आहेत. तसेच, टाटाच्या इलेक्ट्रिक कार प्रचंड लोकप्रिय ठरताना दिसत आहेत.
टाटा मोटर्सच्या शेअरने एका वर्षामध्ये सुमारे 180 टक्क्यांची वाढ करत अधिक परतावा दिला आहे.
त्यामुळे टाटा मोटर्स शेअर मार्केटमध्येही चर्चेत आली आहे. तसेच गुंतवणूकदारांनाही लाभ मिळत आहे.

 

टाटा ग्रुपचा मार्केट कॅप 21.99 लाख कोटींवर गेला आहे. टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची देखील मोठी गुंतवणूक असून,
या कंपनीमध्ये 1.11 टक्के हिस्सा झुनझुनवाला यांचा आहे. याची किंमत साधारण 1 हजार 796 कोटी इतकी आहे.
दरम्यान, आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण 29 कंपन्या शेअर मार्केटमध्ये (Stock market) सूचीबद्ध झालेल्या आहेत.

तसेच, पुढील काळात इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांचा विभाग वाढवण्यावर कंपनीचा ‘लक्ष’ राहणार असून नुकतीच 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
या माध्यमातून येत्या चार ते पाच वर्षामध्ये टाटा अजून दहा नवीन इलेक्ट्रिक वाहने भारताच्या बाजारात उतरवणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

दरम्यान, 2016 ते 2021 रोजी पर्यंत, टाटाने शानदार कार लाँच केल्या आहेत. त्यापैकी काही त्यांच्या सेगमेंटमधील बेस्ट सेलर आहेत.
त्याचबरोबर टाटा हा एकमेव भारतीय ब्रँड आहे ज्याकडे देशात नेक्सॉन, अल्ट्रोझ आणि पंच या तीन 5 स्टार रेटेड कार आहेत.
तर, कंपनीची इलेक्ट्रिक एसयूव्ही कार टाटा नेक्सॉन ईवी (Tata Nexon EV) भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे.
एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही एसयूव्ही 312 किमीपर्यंतची जबरदस्त ड्रायव्हिंग रेजे देते आहे.

 

Web Title : Tata Group | tata group tata motors jumps nearly 180 percent 2021 rakesh jhunjhunwala increase investment in that

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Penny Stock | रु. 1.85 चा शेयर 97 रुपयांचा झाला, दिड वर्षात 1 लाखाचे झाले 52 लाख, दिला 5150% रिटर्न; तुमच्याकडे आहे का?

Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘थँक्यू टॅक्स पेयर’ बॅनर लावून निषेध

Legislative Council Elections | काँग्रेसचे सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, महाडिक यांची माघार