Pune PMC News | टिळेकरनगर येथील सिंहगड सिटी स्कूलच्या आठमुठ्या भुमिकेमुळे कात्रज- कोंढवा रस्त्याच्या तिढा वाढला !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | विकास आराखड्यातील (Development Plan) रस्त्यासाठी जागा देण्यास आठमुठी भुमिका घेणार्‍या कोंढव्यातील टिळेकरनगरमधील सिंहगड सिटी स्कूल (Sinhagad City School, Kondhwa) विरोधात कडक कारवाई करण्यासाठी महापालिका प्रशासनामध्ये (Municipal Administration) हालचाल सुरू झाली आहे. अगोदरच चुकीची माहिती सादर करून बेकायदा परवानगी घेतलेल्या या शाळेच्या वास्तुची मान्यता रद्द करण्यासोबतच आगामी वर्षात नवीन ऍडमीशन (New Admission) होणार नाहीत, यासाठी कायदेशीर चर्चा सुरू असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. (Pune PMC News)

टिळेकरनगर येथे सुमारे १५ वर्षांपुर्वी सिंहगड सिटी स्कूलची वास्तू उभारण्यात आली आहे. ही वास्तू उभारत असताना शाळा प्रशासनाच्यावतीने (School Administration) नकाशावर दर्शविण्यात आलेला रस्ता हा प्रत्यक्षात स्थानीक शेतकर्‍यांच्या खाजगी जागेवर होता. या शाळेच्या बाजूला स्थानीकांच्या जागा आहेत. महापालिकेने कात्रज-कोंढवा रस्त्यावरील (Katraj-Kondhwa Road) वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी गंगाधाम येथून येवलेवाडीकडे जाण्यासाठी अंडरपासचे काम सुरू केले आहे. यासाठी मागील काही वर्षांपुर्वी विकास आराखड्यामध्ये आखलेल्या रस्त्यावरूनच हा रस्ता येवलेवाडीकडे जाणार आहे. हा रस्ता सिंहगड सिटी स्कूल येथून जात असून या बाजूला शेतकर्‍यांच्या व विविध सोसायटींच्या जमिनी आहेत. या सर्व शेतकर्‍यांनी रस्त्यासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली असली तरी सिंहगड सिटी स्कूलने जागा देण्यास विरोध दर्शविला आहे. यामुळे अंडरपाससाठी काम सुरू झाल्यानंतर पुन्हा भूसंपादनाअभावी काम ठप्प होण्याची भिती निर्माण झाली आहे. (Pune PMC News)

महापालिका प्रशासनाने सिंहगड सिटी स्कूलच्या व्यवस्थापनाला वेळोवेळी विनंती केली आहे. परंतू व्यवस्थापन रोख मोबदल्यासाठी आडमुठी भुमिका घेत आहे. विशेष असे की हा वाद सुरू झाल्यानंतर स्थानीक शेतकर्‍यांनी महापालिकेकडून घेतलेल्या माहितीनुसार शाळा बांधताना रस्ता नसतानाही चुकीची कागदपत्र सादर करून शाळा प्रशासनाने मान्यता घेतल्याचे निदर्शनास आले आहे. परंतू आता शाळा प्रशासनाने महापालिकेने कुठल्या आधारावर शाळेला सुविधा पुरविल्या असा उलट सवाल करत पालिकेवरच डोळे वटारले आहेत. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भिती दाखवत आपला हेका कायम ठेवल्याचा आरोप स्थानीक शेतकरी (Farmer) करत आहेत.

 

सिंहगड सिटी स्कूलच्या या हेकेखोर वागणुकीमुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या जागेवरील रस्त्यांवर खोदाई करून शाळेकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद केले आहेत. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या बसेस शाळेच्या आवारातच अडकुन पडल्याने शाळा बंद ठेवण्यात आली असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण (Online Education) सुरू केले आहे. (Pune PMC News)

यासंदर्भात महापालिकेच्या अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता,
कात्रज- कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Traffic Jam) सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे.
कोंढवा ते येवलेवाडी असा अंडरपास करण्यासाठी कात्रज कोंढवा रस्ता बंद ठेवावा लागणार असून
सिंहगड सिटी स्कुल समोरून पर्यायी रस्ता तयार करण्यात येणार आहे.
सिंहगड सिटी स्कूलच्या भुमिकेचा प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे.
शाळेने रस्त्यासाठी महापालिकेला जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी चर्चा सुरू आहे.
परंतू यानंतरही या शाळेचे बांधकाम बेकायदा असल्याने परवानगी रद्द करण्यापासून
पुढीलवर्षीपासून या शाळेतील प्रवेश बंद करण्याच्या पर्यांयावरही कायदेशीर
बाजू तपासून पुढे जाउन कार्यवाही करण्याचा मार्गही खुला असल्याची माहिती प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | The Katraj-Kondhwa road has increased due to the eight-handed role of Sinhagad City School in Tilekarnagar!

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा