Sanjeevani Karandikar | बाळासाहेब ठाकरे यांची लहान बहीण संजीवनी करंदीकर यांचे पुण्यात निधन; अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjeevani Karandikar | शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या लहान बहिण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आत्त्या संजीवनी करंदीकर यांचं निधन (Died) झालं आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या. संजीवनी करंदीकर यांचं वृद्धापकाळाने सकाळच्या सुमारास पुण्यात (Pune) निधन झालं. (Sanjeevani Karandikar passed away in Pune.)

 

संजीवनी करंदीकर (Sanjeevani Karandikar) या बाळासाहेब ठाकरे यांच्या सख्ख्या बहीण होत्या.
संजीवनी करंदीकर यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात सेक्शन अधिकारी म्हणून काम केलं होतं. त्या पुण्यात राहायला होत्या.
त्यांच्या निधनामुळे ठाकरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली असून सर्वजण संजीवनी करंदीकर यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

 

 

दरम्यान, पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत (Vaikuntha Smashan Bhumi Perne) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे हे पुण्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 

 

Web Title :- Balasaheb Thackerays younger sister Sanjeevani Karandikar dies in Pune Chief Minister Uddhav Thackeray Rashmi Thackeray and Aditya Thackeray are expected to be present for the funeral

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा