Sanjog Waghere On Shrirang Barne | दिल्लीवरून सहा जणांचं पथक येतं, म्हणजेच महायुतीचा बारणेंवर विश्वास राहिला नाही, संजोग वाघेरेंची टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjog Waghere On Shrirang Barne | अब की बार, फिरसे अप्पा बारणे खासदार, असा नारा बारणेंनी स्वतःसाठी दिला असला, तरी जनतेने अब की बार, महाविकास आघाडीचा उमेदवार (Mahavikas Aghadi) हे ठरवले आहे. दिल्लीवरून सहाजणांचे पथक मावळ लोकसभेत (Maval Lok Sabha) येते, यातूनच बारणेंवर महायुतीचा (Mahayuti Candidate) विश्वास राहिला नाही हे स्पष्ट होते, अशी टीका महाविकास आघाडीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावर केली आहे.(Sanjog Waghere On Shrirang Barne)

विरोधी उमेदवार कोण आहे, मला माहित नाही, असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी श्रीरंग बारणे यांनी केले होते.
यावरून वाघेरे यांनी पुन्हा एकदा बारणे यांच्यावर निशाणा साधला. वाघेरे म्हणाले, मी तर मावळ लोकसभेतील अनोळखी
उमेदवार आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळविले होते का?

संजोग वाघेरे पुढे म्हणाले, मी मोदींचा आदर करतो. त्यांच्यासंदर्भात मला काही टिपण्णी करायची नाही.
बारणे जर समोरच्या उमेदवाराला ओखळत नाहीत, तर त्यांनी प्रचारासाठी यावे, असे मोदींना का सांगितले.
मोदींना सभेसाठी यावे लागते याच्यातच आपण ओळखून घ्यावे की त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत आहे.

दरम्यान, मावळमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमधील निवडणुकीचा सामना चांगलाच रंगला आहे.
मविआचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत.
पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिक, सोसायट्यांमध्ये जाऊन मशाल‌ चिन्ह पोहोचवले
जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

Shivajirao Adhalrao Patil On Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी केलेल्या ‘त्या’ आरोपाने आढळराव संतापले, म्हणाले ”पुरावे द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो, अथवा तुम्ही बाहेर पडा”

Shaina NC In Pune | येत्या काळातही महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री व्हावी यासाठी आम्ही भूमिका मांडू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांच्या प्रश्‍नांवर संवेदनशील – शायना एन.सी.

Ajit Pawar On Sharad Pawar | ह्यांनी केलं की स्ट्रॅटेजी मी केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Cheating Fraud Case | पुणे : म्हाडा स्कीममध्ये फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

Murlidhar Mohol | पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ तरुणांची बाईक रॅली; महाविद्यालयीन काळातला जल्लोष पुन्हा अनुभवल्याची मोहोळ यांची प्रतिक्रिया