Sanjog Waghere On Shrirang Barne | मावळात दोन उमेदवारांमध्ये रंगला कलगीतुरा, संजोग वाघेरे म्हणाले, ”श्रीरंग बारणेंना रावणी अहंकार…”

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjog Waghere On Shrirang Barne | रावणाचा देखील अहंकार जळून खाक झाला होता. रावणाची लंका शेवटी जळाली होती हे श्रीरंग बारणेंनी विसरू नये. त्यांच्या अहंकाराचा मतदार अंत करतील, अशी टीका मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार (Mahavikas Aghadi) संजोग वाघेरे यांनी केली आहे. माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे, हे मला माहीत नाही, असे विधान बारणे यांनी केले होते, त्याला वाघेरे यांनी प्रत्युत्तर दिले. ते पत्रकारांशी बोलत होेते.(Sanjog Waghere On Shrirang Barne)

महायुतीच्या (Mahayuti) पत्रकार परिषदेत श्रीरंग बारणे म्हणाले होते की, माझ्या विरोधात कोण उमेदवार आहे. हे मला माहीत नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच मला उमेदवार कळेल. यावरून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Maval Lok Sabha Election 2024)

संजोग वाघेरे म्हणाले, श्रीरंग बारणे यांचे विधान हे बालिशपणाचे असून १९८७ पासून मी राजकारणात आणि समाजकारणात
कार्यरत आहे. आम्ही दोघेही एकाच मतदारसंघात राहात आहोत, तरी ते मला ओळखत नसतील तर तो त्यांचा अहंकार आहे.

वाघेरे म्हणाले, रावणाचा देखील अहंकार जळून खाक झाला होता. रावणाची लंका शेवटी जळाली होती हे बारणेंनी विसरू नये.
श्रीरंग बारणेंच्या अहंकाराचा मतदार अंत करतील, असे वाघेरे म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Lok Sabha Election 2024 | साताऱ्यातून अखरे उदयनराजे भोसलेंना भाजपाची उमेदवारी; भोसले विरूद्ध शिंदे सामना रंगणार

Vadgaon Sheri Pune News | पुणे : बागेत खेळणाऱ्या लहान मुलांसोबत अश्लील कृत्य, नारधमास अटक

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामतीसाठी अजित पवारांनीही घेतला उमेदवार अर्ज, हा प्लॅन ‘बी’ आहे की ‘ए’, राजकीय वर्तुळात चर्चा