Sanjog Waghere On Shrirang Barne | संजोग वाघेरेंनी सोडले बारणेंवर टीकास्त्र, ”दहा वर्षात एकही प्रकल्प नाही, कामगार, पर्यटन, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले…”

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjog Waghere On Shrirang Barne | दहा वर्षात मावळ मतदारसंघात (Maval Lok Sabha) एकही नवीन प्रकल्प आला नाही. मतदारसंघात औद्योगिक पट्टा मोठा असून कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेय. पर्यटनाला चालना दिली नाही. पाणी, रस्ते, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालाय. पवना नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले, असा विद्यमान खासदारांच्या अपयशाचा पाढा वाचत मावळचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार संजोग वाघेरे यांनी श्रीरंग बारणे यांच्यावर टीकास्त्र सोडले. (Sanjog Waghere On Shrirang Barne)

महाविकास आघाडीने आकुर्डी (Akurdi) येथे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी संजोग वाघेरे बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटचे (Shivsena UBT) जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, महिला शहराध्यक्ष सायली नढे, आपच्या शहराध्यक्षा मीना जावळे, प्रचार प्रमुख योगेश बाबर, मानव कांबळे, मारुती भापकर, अनिता तुतारे, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्योती निंबाळकर इत्यादी उपस्थित होते.

श्रीरंग बारणे यांच्यावर टीका करताना वाघेरे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या (Pimpri Chinchwad City) विकासात आमचे मोठे योगदान आहे. मी आणि माझे वडिलांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर म्हणून काम केले आहे. माझी पत्नी गेली १५ वर्षे नगरसेविका आहे. त्यामुळे बारणे यांचा अभ्यास कमी आहे.

मी किमान पावणेचार लाख मतांनी मी विजयी होईल, असा दावा संजोग वाघेरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
उमेदवारी अर्ज भरण्याची माहिती देताना ते म्हणाले, मंगळवारी मी उमेदवारी अर्ज भरणार आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, डॉ. अमोल कोल्हे,
शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहर भोईर आणि मविआचे कार्यकर्ते व पदाधिकारी
उपस्थित राहणार आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर
मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार