Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | पुण्यात मनसे नेते अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले – ‘आत्मविश्वास आणखी वाढला, विजय अधिक सोप्पा झाला’ (Videos)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भाजपाला (BJP) पाठिंबा दिल्यानंतर आज पहिल्यांदाच पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अमित ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे मुरलीधर मोहोळ यांचे बळ आणखी वाढल्याचे दिसून आले. (Murlidhar Mohol Meet Amit Raj Thackeray)

या भेटीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, आदरणीय राज साहेबांनी मोदीजींना आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. आज पुण्यात अमित ठाकरे यांची भेट झाली. ते म्हणाले, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही ताकदीने मागे उभे राहणार आहोत. त्यामुळे आमचा आत्मविश्वास आणखी वाढला. आमचा विजय अधिक सोपा झाला. कारण राज साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग शहरात आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, मनसेची संघटनात्मक ताकद अनेक वर्षापासून पुण्यात आहे. आता आम्ही एकत्र काम करणार आहोत. निश्चितपणे या विजयाचे मोठ्या विजयामध्ये रुपांतर होईल. अमित साहेबांशी महत्वाची चर्चा झाली. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. निवडणुकीच्या रणनितीविषयी बोलणे झाले. मी त्यांना शब्द दिला आहे की, मनसे (MNS), राष्ट्रवादी (NCP), शिवसेना (Shivsena) आणि भाजपा अग एक दिलाने काम करु आणि निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असा विजय मिळवू.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Police Officer In Pune | पुण्यात पोलिसांवरील हल्ले सुरूच; भांडण सोडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली

Pune Estate Broker Arrested On Mumbai Airport | मुंबई विमानतळावर BMW कारमध्ये सापडले US बनावटीचे पिस्तूल अन् काडतुसे, पुण्यातील रिअल इस्टेट ब्रोकर तुषार काळे, सचिन पोटे, आकाश शिंदेला अटक

Shewalwadi Pune Firing Case | पुणे हादरलं, सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार; ‘सिक्युरिटी एजन्सी’च्या वादातून गोळीबार