Sanskruti Balgude | अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या ‘त्या’ अदांवर चाहते घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – छोट्या पडद्यावरील ‘पिंजरा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude). आजवर तिच्या अभिनयाच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. संस्कृती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती नेहमीच तिचे विविध फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते. संस्कृतीने (Sanskruti Balgude) छोट्या पडद्या सोबतच मोठ्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाचे ठसे उमटवले आहेत.

अभिनयाव्यतिरिक्त संस्कृतीला चित्रकला, फॅशन, भरतनाट्यम या गोष्टींमध्येही रस आहे. संस्कृतीने नुकताच शेअर केलेल्या कॅज्युअल लुकमधील फोटोज आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिने नुकतेच नवे फोटोशूट केले असून ते सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहेत.

संस्कृतीचे हे ब्लॅक अँड व्हाईट फोटोज सध्या चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहेत. या फोटोमध्ये संस्कृतीने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केल्याचे दिसत आहे. तर यामध्ये तिने न्यूड मेकअप करत केस मोकळे सोडत तिचा लूक पूर्ण केला आहे. संस्कृतीने (Sanskruti Balgude) आजवर छोटा पडद्यावर ‘विवाह बंधन’, ‘पिंजरा’ यासारख्या मालिके नंतर तिने 2014 मध्ये मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. संस्कृतीने आजवर ‘टेक केअर गुड नाईट’, ‘सांगते ऐका’, ‘निवडुंग’, ‘फु फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘भय’, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’, ‘लग्न मुबारक’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 

 

Web Title :- Sanskruti Balgude | sanskruti balgude shared black and white photos see her photos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाल्या-‘दादा नेमकं काय म्हणाले हे शांतपणे ऐकून घेतलं तर…’

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून रिमूव्ह केल्याने ग्रुप अ‍ॅडमिनची जीभ कापली

Maharashtra Politics | भाजप-शिंदे गटात राऊत भांडण लावत आहेत; शिंदे गटातील मंत्र्याचा राऊतांवर आरोप