संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ ओढण्याचा मान ‘सोन्या-राजा’ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – यावर्षी जगद्गुरू तुकोबाच्या पालखीच्या रथाला देहू ते पंढरपूर ओढण्याचा मान बाणेर मधल्या बाबुराव चिंधु विधाते यांच्या सोन्या-राजा या बैलजोडीला आणि आंबेगाव नऱ्हे येथील रविंद्र बाळासाहेब कोंढरे यांच्या बैलजोडीला मिळालाय. बैलजोडीचा मान मिळावा यासाठी तब्बल १४ बैलजोडी मालकांनी तुकाराम महाराज संस्थांकडे अर्ज सादर केले होते. त्यापैकी सात बैल जोडीची निवड करण्यात आली होती.

सोन्या- राजाची ही सुंदर बैलजोडी यावर्षी जगदगुरू संत तुकोबारायाच्या पालखीला खेचणार आहे. विश्वस्त मंडळाकडे यासंदर्भात १४ मालकांकडून बैल जोड्यांचे प्रस्ताव आले होते. विश्वस्त मंडळाने पाहणी केल्यावर बाणेर येथील बाबुराव चिंधु विधाते आणि रविंद्र बाळासाहेब कोंढरे यांच्या बैलजोडीची निवड केली.

यंदा विश्वस्त मंडळाकडे १४ अर्ज आले होते. त्यापैकी ७ बैल मालकांची जनावरे ही सुदृढ शरीरयष्टीची होती. तुकाराम महाराज संस्थानांच्या निवड समितीकडून बैलांची निवड करणे अवघड झाले होते. यासाठीच सातही बैल मालकांच्या नावाची चिठ्ठी उडवून रथासाठी बैलांची निवड करण्यात आली.

सिनेजगत

ब्रेकअपनंतर अशी झाली होती शाहिद कपूरची ‘हालत’

वाढदिवशीच दिशा पाटनीच्या घरी आला ‘नवा पाहुणा’

सलमान खान म्हणतो, ‘हे’ वय लग्नासाठी एकदम ‘सही’

‘लाल सिंह चढ्ढा’ मध्ये पुन्हा ‘थ्री इडियट’ची जोडी आमिर खान व करिना कपूर घालणार प्रेक्षकांना ‘भुरळ’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like