Santosh Juvekar | मराठी चित्रपटावरील संतोष जुवेकरची फेसबुक पोस्ट चर्चेत; म्हणाला किंमतच करत नाही …

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मराठी अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) चा 36 गुण (36 Gunn) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. परंतु हा चित्रपट अवघ्या एका आठवड्यातच थेटर मधून उतरला गेला. यावर खंत व्यक्त करत संतोषने (Santosh Juvekar) फेसबुकवर एक पोस्ट (Facebook Post) लिहिली. सध्या संतोषची ही पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

 

संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार (Purva Pawar) यांचा 36 गुण हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट संपूर्ण चित्रपट गृहातून एका आठवड्यातच उतरवला गेला. त्यावर संतोष जुवेकरने एक पोस्ट लिहून खंत व्यक्त केली आहे.

 

संतोषने (Santosh Juvekar) आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मित्रांनो आपला सिनेमा एका आठवड्यातच चित्रपटगृहातून उतरवण्यात आला.
ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहिला त्या सर्वांचे मनापासून आभार…… कांतारा सुपरहिट फिल्म नक्की बघा……..
साउथ फिल्म कमाल……. डबिंग फिल्म आहे तरीही महाराष्ट्रात गाजते ……..
साला किती हि घासा आपलीच माणसं आपल्या पाठीवर शाबासकीची थाप देत नाहीत आणि किंमत ही करत नाहीत.
पण मला शोकांतिका आहे…… असो काळजी घेऊया मनापासून धन्यवाद……. सगळ्या पत्रकार मित्रांना देखील धन्यवाद……. लवकरच नवीन काहीतरी घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन” संतोष जुवेकरची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

Web Title :- Santosh Juvekar | marathi actor santosh juvekar viral fb post on marathi cinema and kantara

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला

Sanjay Raut | संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘फुटिरांच्या गटात एक शिंदे कायम …’

Eng vs Pak Final | पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, जाणून घ्या काय आहे तो विक्रम?