सारा अली खानच्या काशी विश्वनाथ मंदिरात जाण्यावरून नवा ‘वाद’, गंगा आरतीमध्ये झाली होती ‘सहभागी’

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सारा अली खान नुकतीच बनारसच्या काशी विश्वनाथ मंदिरात गेली होती. सारा तिची आई अभिनेत्री अमृता सिंह सोबत गंगा आरतीमध्ये सहभागी झाली होती. यावरून आता वाद सुरू झाला आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार साराचं हे आरती करणं आणि स्पर्श दर्शन करणं अपवित्र असल्याचं एका हिंदू संघटनेनं आणि देवबंद पुरोहितांनी सांगितलं आहे. सारा सिनेामाच्या शुटींगासाठी बनारसला गेली होती. यावेळी ती आपल्या आईसोबत काशी विश्वनाथ मंदिरातही गेली होती. सारा सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. मी मुस्लिम असल्यानं आता हिंदू मंदिरात गेल्यानं वाद सुरू झाला आहे.

केंद्रीय ब्राह्मण महासभेनं सारांच्या कृत्याची टिका करत मंदिराच्या प्रवेशद्वारावर आदेश लावला आहे. या आदेशात म्हटलं आहे की, “जे हिंदू धर्माशी संबंधित नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी प्रवेश करू नये.”

महासभेचे महासचिव दिनेश तिवारी याबाबत बोलताना म्हणाले, “सारा अली खान मंदिरात गेली. गैरहिंदूंना बंदी असूनही तिनं स्पर्श दर्शन केलं हे आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. मंदिराचे अधिकारी सनातन परंपरा कायम ठेवण्यात अयशस्वी झाले. आमचे वरिष्ठ सदस्य या मुद्द्यावर चर्चा करतील. साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर आता ती कुली नंबर वन या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन असणार आहे. याशिवाय सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करत आहे.