Sara Sachin Tendulkar | …म्हणून सारा तेंडुलकर झाली भलतीच खुश; इंस्टाग्रामवर पोस्ट केला ‘हा’ फोटो, झाला क्षणात ‘व्हायरल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sara Sachin Tendulkar | इंडियन प्रिमियर लिग (IPL 2022 Auction) चा हंगाम थरार होणार आहे. यंदाच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मजबूत टीमची बांधणी केली आहे. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये भारताचा स्टार खेळाडू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरची (Arjun Tendulkar) एन्ट्री असणार आहे. दरम्यान, अर्जुन तेंडुलकर याचं नाव येताच मुंबईने लिलाव पॅडल उंचावले तर इकडे गुजरात टायटन्सने देखील पॅडल उंचावल्याने सगळेच थक्क झालेत. (Sara Sachin Tendulkar)

 

अर्जुन तेंडुलकरला मुंबई टीमकडे परतल्यानंतर त्याची बहिण सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) हिने खास फोटो पोस्ट करत अर्जुनचं अभिनंदन केलं आहे. साराने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) स्टोरीवर फोटो पोस्ट केला आहे. दरम्यान आता साराची इन्स्टा स्टोरी जाणून घ्या.

 

अर्जुनने गतवर्षी आयपीएलच्या लिलावामध्ये नाव नोंदणी केली होती. त्याचबरोबर मुंबईची टीम त्याला विकत घेईल अशी आशा होत होती. दरम्यान लिलावामध्ये प्रथमता जेव्हा त्यांचे नाव घेतलं त्यावेळी कोणी देखील वाली मिळाला नाही. त्यानंतर संपूर्ण लिलावप्रक्रिया पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा UNSOLD खेळाडूंची नावे लिलावासाठी ठेवली. त्या दरम्यान, मुंबई इंडियन्सने वीस लाखांच्या मूळ दरात अर्जुनला विकत घेतलं होतं. या वेळेसही तो मूळ दरात विकत घेतला जाईल असं वाटत असताना गुजरातने बोली लावत त्याची किंमत वाढली. (Sara Sachin Tendulkar)

 

दरम्यान, अर्जुन तेंडुलकरनं मुंबईच्या सीनिअर टीममध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 लीगमधून पदार्पण केलं होतं.
त्यावेळी त्याने 2 सामन्यात 2 विकेट्स घेतल्या.
मुंबईच्या सीनियर टीमकडून पदार्पण करताच अर्जुन आयपीएल ऑक्शन साठी पात्र ठरला होता.
जुलै – ऑगस्ट 2019 नंतर 21 वर्षीय अर्जुन प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला उतरला.
याआधी त्याने 2018 साली श्रीलंकेविरुद्धच्या 4 दिवसीय 2 सामन्यांत 19 वर्षांखालील टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं होतं.
अर्जुन याआधी मुंबईच्या 19 वर्षांखालील टीमकडून खेळला होता आणि 2017 – 18 च्या कूच बिहार ट्रॉफीत त्याने 19 विकेट्स घेतल्या. त्यामध्ये त्याने 2 सामन्यात पाच – पाच विकेट्स घेतल्या होत्या.

 

Web Title :- Sara Sachin Tendulkar | so Sara Sachin Tendulkar was very happy This photo posted on Instagram went viral in an instant

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा