Pradhan Mantri Kharif Pik Yojana | २५ लाख शेतकऱ्यांना १,३५२ कोटी नुकसानभरपाई; विमा कंपन्या तयार! पावसाच्या खंडामुळे २५ टक्के लाभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान खरीप पीक योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kharif Pik Yojana) एकवीस दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या (Insurance Company) तयार झाल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील सोळा जिल्ह्यांमधील सुमारे पंचवीस लाख शेतकऱ्यांना १,३५२ कोटी रुपये मिळणार आहेत. (Pradhan Mantri Kharif Pik Yojana)

परंतु, ४ जिल्ह्यांमध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय घेतलेला नसल्याने कृषी सचिव या कंपन्यांशी चर्चा करणार आहेत. २८ जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा जास्त झाल्याने पीक उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली होती. या नुकसानीचे सर्वेक्षण कृषी विभागाने केले होते.

या संदर्भात विमा कंपन्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. त्यातील बुलढाणा, बीड व वाशिम या तीन जिल्ह्यांमधील अपील राज्यस्तरावर केले होते. ही सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यानुसार बुलढाणा व बीड जिल्ह्यांतील अधिसूचना मान्य करत संबंधित विमा कंपनीने अग्रिम रक्कम देण्यास मान्यता दिली आहे. परंतु, वाशिम जिल्ह्याबाबत संभ्रम कायम आहे. (Pradhan Mantri Kharif Pik Yojana)

नाशिक, जळगाव, नगर, सोलापूर, सातारा, परभणी, नागपूर, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगली, बुलढाणा, नंदूरबार, धुळे, पुणे, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये अग्रिम रक्कम शेतकरी वर्गाला देण्यात येणार आहे.

कोल्हापूर, परभणी, सांगली, बुलढाणा, जालना, नागपूर या जिल्ह्यांवर विमा कंपन्यांचे आक्षेप नाही.
त्यामुळे लवकर या जिल्ह्यांना सुद्धा अग्रिम मिळण्याची शक्यता आहे. तर नगर,
धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सातारा,
अकोला हे अंशत: आक्षेप असलेले जिल्हे आहेत. तर चंद्रपूर, नांदेड,
लातूर व हिंगोली या जिल्ह्यांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुणेकरांसाठी खुशखबर! लवकरच मोबाईल अ‍ॅपवर मिळणार ‘पीएमपी’चे तिकीट,
लाइव्ह लोकेशन कळणार