ससूनचे अधिष्ठाता अजय चंदनवाले यांची पदावरुन हकालपट्टी करा, अन्यथा काळे फासू- तृप्ती देसाई 

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन-

ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठता डाॅ. अजय चंदनवाले यांनी चुकीचे अपंग प्रमाणपत्र सादर करुन स्वतःची अधिष्ठता या पदावर नेमणूक करुन शासनाची तसेच दिव्यांगाची फसवणूक केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. याबाबत ताबडतोब चाैकशी करुन, अधिष्ठता या पदावरुन त्यांची आठ दिवसाच्या आत हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकून तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देसाई यांनी  दिला आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’87305542-7f6b-11e8-8a2c-85ab37ca91fd’]

2011 साली चंदनवाले यांची डिन या पदावर निवड अपंग प्रवर्गातून करण्यात आली होती.  या अगोदर अस्थिव्यंगोपचार शास्त्र या विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत होते. चंदनवाले यांनी  अधिष्ठता हे पद मिळवण्यासाठी बनवाबनवी करुन तसेच स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करत ससून रुग्णालयातून 55 टक्के अपंगात्वाचे प्रमाणपत्र मिळविले. मात्र वास्तविक पाहता अजय चंदनवाले अगदी तंदुरूस्त असून, कोणत्याही अवयवाने ते अपंग दिसत नाहीत असे देखील तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या.

डाॅक्टर चंदनवाले हे जळगावचे असून, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे महाजनांच्या आशिर्वादानेच चंदनावले या पदावर आहेत. गिरीष महाजन यांनी पाठिशी न घालता तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी असे देखील तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.  मुख्यमंत्र्यांनी तीन तज्ञ डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठित करुन चंदनवाले यांची आॅनलाईन तपासणी करावी. त्याच्यामध्ये जर चंदनवाले 40 टक्क्यांच्या वरती अपंग आढळले नाही तर त्यांच्यावर शासनाची फसवणूक केली म्हणून 420 अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात यावा.
[amazon_link asins=’B07BR55J6B’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’94108932-7f6b-11e8-831d-f9c26748560e’]

डाॅक्टर चंदनवाले यांनी मात्र तृप्ती देसाई यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. माझी सर्व प्रमाणपत्र वैध्य असून, मी शासनाची कोणत्याही प्रकारची फरवणूक केलेली नाही. तसेच सर्व कागदपत्रांची योग्य ती तपासणी शासनाकडून करण्यात आली आहे. त्यामध्ये निवडीच्या संदर्भातील सर्व बाबी योग्य प्रकारच्या आहेत. त्यामुळे फसवणूक करण्याचा प्रश्नच येत नाही. मी गेल्या अनेक दिवसापासून प्रामाणिकपने रुग्णांची सेवा करत आहे.आणि पुढे देखील करत राहिल असे देखील चंदनवाले यांनी स्पष्ट केले आहे.