Satara ACB Trap | 10 हजार रुपये लाच घेताना कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

फलटण : पोलीसनामा ऑनलाइन – Satara ACB Trap | शेतकरी अपघात विमा योजना (Farmers Accidental Insurance Scheme) प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरीसाठी पाठवण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) तालुका कृषी विभागातील कृषी पर्य़वेक्षकास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Satara ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. बाळू निवृत्ती गावडे Balu Nivritti Gawde (वय-52 रा. प्रगती नगर, बारामती जि. पुणे) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

 

याबाबत फलटण तालुक्यातील 46 वर्षीय तक्रारदाराने सातारा एसीबीकडे (Satara ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या मयत पत्नीचे शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण मंजुरीसाठी तालुका कृषी विभागाकडे दिले होते. हे शेतकरी अपघात विमा योजना प्रकरण वरिष्ठ कार्यालयात मंजुरी करता पाठवण्यासाठी फलटण मधील कृषी पर्य़वेक्षक बाळू गावडे यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी तक्रार दिल्यानंतर सातारा एसीबीच्या पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे (DySP Sujay Ghatge)
यांच्या मार्गदार्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत (Police Inspector Sachin Raut),
पोलीस नाईक विनोद राजे, पोलीस शिपाई तुषार भोसले यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Satara ACB Trap | agriculture supervisor arrested for taking bribe of 10 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अजित पवारांचा बावनकुळेंना इशारा, म्हणाले-‘ठरवलं ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, करेक्ट कार्यक्रम करेल’

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, वसंत मोरेंची नाराजी दूर होणार?

Uddhav Thackeray | कर्नाटक विरोधात विधीमंडळात एकमताने ठराव मंजुर होताच समोर आली उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…