Satara Crime News | महाबळेश्वर येथे दरीत कोसळून पुण्यातील महिला पर्यटकाचा मृत्यू

सातारा : Satara Crime News | तरुणाईमध्ये मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याची क्रेझ आहे. परंतु सेल्फी काढताना आपण आपला जीव धोक्यात तर घालत नाही ना, याचेही भान राहत नाही. अशाच एका घटनेत पुण्यातील महिलेला जीव गमवावा लागला आहे. महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी गेलेल्या महिलेला सेल्फीचा मोह आवरला नाही. सेल्फी काढण्याच्या नादात महिलेचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.10) दुपारच्या सुमारास घडली. (Satara Crime News)

मृत महिला पर्यटक पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळली. अंकिता सुनिल शिरसकर (वय-33) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. महाबळेश्वर येथे सेल्फी घेताना अंकिता या खोल दरीत कोसळल्या. त्यांचा मृतदेह खोल दरीत तीनशे फूटावर आढळून आला. (Satara Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अंकिता पतीसोबत पुण्याहून महाबळेश्वरला पर्यटनासाठी आली होती. ते दोघे दुचाकीवरुन आले होते. यावेळी केट्स पॉईंट परिसरातील नीडल होल पॉईंट येथ अंकिता सेल्फी घेत होती. त्यावेळी तिचा तोल जाऊन ती खोल दरीत कोसळली. दोनशे ते तीनशे फूट दरीत कोसळल्याने तिचा मृत्यू झाला.

सध्या महाबळेश्वर येथे पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसत आहे. येथील अनेक पॉईंट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
निसर्ग पाहून अनेक पर्यटक भारावून जातात. त्यासाठी ते सेल्फी काढण्यासाठी पुढे सरसावतात.
असाच प्रयत्न अंकिता यांनी केला. परंतु तो त्यांच्या अंगलट आला आणि त्या दरीत कोसळल्या.
घटनेनंतर महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स, पोलीस, वनविभाग यांच्याकडून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आहे म्हणत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 18 लाखांचा गंडा

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम