Satara Crime News | धक्कादायक! जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतला अन् 15 मिनिटानंतर बाप-लेकाचा मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime News | आयुर्वेदिक काढा (Ayurvedic Extract) प्यायल्याने पिता पुत्राचा मृत्यू (Death) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना साताऱ्यातील (Satara News) फलटणमध्ये घडली. फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर (Hanmantrao Potekar) (वय 55) आणि अमित पोतेकर (Amit Potekar) (वय 32 ) या पितापुत्रांचा आकस्मित मृत्यू झाला. आयुर्वेदिक काढा प्यायल्याने दोघांचाही मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच (Autopsy Report) दोघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेने फलटण शहरात (Phaltan City) हळहळ व्यक्त होत आहे. (Satara Crime News)

याबाबत माहिती अशी की, फलटण शहरात गजानन चौक येथे राहणारे हनुमंतराव पोतेकर आणि त्यांचा मुलगा अमित पोतेकर यांनी रात्री कुटुंबासमवेत जेवण केले. जेवणानंतर कुटुंबातील सर्वांनी आयुर्वेदिक काढा प्यायला.
पण काढा प्यायल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हणमंतराव, मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला.
त्रास सुरु झाल्याने तिघांनाही रात्रीच फलटण शहरातील खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल केले होते. (Satara Crime News)

उपचार सुरू असतानाच पहाटे हनुमंतराव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पंधरा मिनिटांनीच मुलगा अमित याचाही मृत्यू झाला.
मात्र मुलीचा जीव वाचला. मुलीच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. पण पिता पुत्राच्या मृत्यूने पोतेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
दोघांचा मृत्यू काड्यातून झालेल्या विषबाधेमुळे झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच
स्पष्ट होणार आहे.

Web Title : Satara Crime News | sudden death of father and son after taking ayurvedic extract after meal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rupali Chakankar On Sadabhau Khot | शरद पवारांना ‘सैतान’ म्हणणाऱ्या सदाभाऊंना रुपाली चाकणकरांनी सुनावले खडेबोल, म्हणाल्या – ‘आपला आवाका आणि कुवत बघून बोला’

Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘मला हलताही येत नव्हतं हे खरं, पण तेव्हा…’, एकनाथ शिंदेंच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर (व्हिडिओ)

Pune Police Crime Branch News | गुन्हे शाखेकडून बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणार्‍याला बुधवार पेठेतून अटक; अग्नीशस्त्र जप्त

Maharashtra Rain Update | राज्यभर 12 ते 14 जुलैदरम्यान हलक्या सरींची शक्यता; IMD