Satara Double Murder Case | सख्ख्या चुलत भावाकडून भाऊ-भावजयचा निर्घृण खून, मुलाच्या ‘त्या’ कृत्यामुळे आई-वडिलांना गमवावा लागला जीव

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Double Murder Case | डबल मर्डरच्या घटनेमुळे सातारा जिल्हा हादरुन गेला आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील आंधळी येथे सख्ख्या चुलत भावाने भाऊ आणि भावजयचा कुऱ्हाडीने सपासप वार करुन निर्घृण खून केला. संजय रामचंद्र पवार (वय-49) व मनीषा संजय पवार (वय-45) असे खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली असून त्यावेळी हे दाम्पत्य शेतात काम करत होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला चार तासात अटक केली असून दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार (वय-35 रा. आंधळी) असे त्याचे नाव आहे. (Satara Double Murder Case)

मिळालेल्या माहितीनुसार, मृत दाम्पत्य आणि आरोपी दादासो यांच्यात वाद होता. संजय पवार यांच्या मुलाने एका तरुणीवर अत्याचार केल्याचा राग आरोपीच्या डोक्यात होता. तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्याने वारंवार दिली होती. या वादातून त्याने खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्यामुळे मुलाने केलेल्या कृत्यामुळे आई-वडिलांना जीव गमवावा लागला आहे. (Satara Double Murder Case)

रविवारी सकाळी घटना उघडकीस

संजय पवार आणि मनिषा पवार दोघेही शनिवारी संध्याकाळी पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी संजय मोटार सुरू करत होते, तर पत्नी शेतात खत टाकत होती. त्यावेळी आरोपीने संजय पवार यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी मनीषा मदतीसाठी धावल्या. आरोपीने त्यांच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. वर्मी घाव बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. पवार दाम्पत्य शनिवारी संध्याकाळी घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी शेतात जाऊन पाहणी केली असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती गावच्या पोलीस पाटील यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. (Satara Crime News)

चार तासात आरोपी गजाआड

या गुन्ह्याचा तपास करत असताना हा खून संजय पवार यांचा सख्खा चुलत भाऊ दादासो पवार याने केल्याची
माहिती पोलिसांना मिळाली. खून केल्यानंतर आरोपी कारने पुण्याला पळून गेला.
पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी पुण्याच्या दिशेने येत होते. त्यावेळी वाटेतच त्यांना आरोपी पुन्हा फलटणमार्गे घरी
येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वाटेतच आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
मयत संजय पवार यांच्या पश्चात आई, एक विवाहित व एक अविवाहित मुलगी, मुलगा आणि भाऊ आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Employees News | महापालिका व शिक्षण मंडळ अधिकारी कर्मचार्‍यांसाठी दसर्‍यापुर्वीच दिवाळीची गोड भेट; ‘एवढं’ सानुग्रह अनुदान जाहीर