सातारा – कोल्हापूर पॅसेंजरचे इंजिन फेल : गाडीस 2 तास विलंब

मिरज : प्रतिनिधी

सातारा – कोल्हापूर पॅसेंजरचे इंजिन गुरुवारी सकाळी सातारा स्थानकात फेल झाले. यामुळे पॅसेंजर सातारा स्थानकातून निघाली नाही. इंजिन फेल झाल्याचे मिरज कंट्रोलला समजताच सांगली स्थानकातील पर्यायी इंजिन साताराकडे रवाना करण्यात आले आहे. पॅसेंजरला 2 तास विलंब होणार असल्याने कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच या विलंबामुळे कोल्हापूर स्थानकातून सकाळी 11 वाजता सुटणाऱ्या कोल्हापूर- मिरज पॅसेंजरचे वेळापत्रक कोलमडले आहे.

[amazon_link asins=’B01MCUSD3L,B008V6T1IW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’66d67edd-a10d-11e8-8f12-b90682372c2b’]

दरम्यान, मिरज – बेळगाव रेल्वे मार्गावर घटप्रभा ते चिक्कोडी रोड स्थानकादरम्यान तांत्रिक कामाच्या दुरुस्तीमुळे तिरुपती – कोल्हापूर हरीप्रिया एक्स्प्रेस 70 मिनिटे तर लोंढा – मिरज पॅसेंजर 50 मिनिटे विलंबाने धावत आहे.