Satara News | दारू विक्रेत्याला महिलांकडून बेदम मारहाण; साताऱ्यातील चिलेवाडीमधील घटना

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Satara News | सातारा जिल्ह्यातील चिलेवाडी या ठिकाणी गावातील काही महिलांनी दारू विकणाऱ्या विक्रेत्याला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली आहे. याचबरोबर महिलांनी दुकानातील दारूच्या बाटल्या फोडल्या. हा विक्रेता बेकायदेशीरपणे दारू विकत होता. आमचे पती दारू पिण्यासाठी या ठिकाणी येतात असे म्हणत या दुकानदारावर हल्ला केला. (Satara News)

मारहाण केल्यानंतर या महिलांनी विक्रेत्याला वाठार पोलिसांच्या ताब्यात दिले. मार खाताना दुकानदार “मला मारू नका, मला माफ करा, मी पुन्हा दारू विकणार नाही, मी बंद करतो”, असं वारंवार सांगत होता तरीदेखील या महिलांनी त्याला बेदम चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. साताऱ्यातील चिलेवाडी या गावातील महिलांचा रुद्रावतार यावेळी पाहायला मिळाला. या हल्ल्यात दारू विक्रेता मोठ्या प्रमाणात जखमी झाला आहे. (Satara News)

नंदूरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील वडझाकन गावामध्ये दारूच्या व्यसनामुळे गावातील सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब झाले होते. त्यामुळे गावातील महिला बचत गट सदस्यांनी गावात असलेले अवैध दारूचे दुकाने तसेच हातभट्टीवरील दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत समोर ते साहित्य जाळून होळी केली होती. गावामध्ये मागच्या 20 ते 25 वर्षांपासून दारूची हातभट्टी असल्यामुळे गावातील महिला प्रचंड वैतागल्या होत्या.

Web Title :-   Satara News | liquor seller was beaten by women in satara chilewadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vanita Kharat Wedding | वनिताच्या लग्नात ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रा’च्या कलाकारांनी केलेल्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल

Nayanthara | अभिनेत्री नयनताराने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव ; म्हणाली “मला मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात…”

Satara News | धक्कादायक ! साताऱ्यात 20 वर्षीय तरूणाचा आढळला मृतदेह

Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीशी व आईसोबत गैरवर्तन, फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक; पिंपरी परिसरातील प्रकार