Satej Patil | ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होणार नाही याची खबरदारी घेऊ’, धनंजय महाडिकांच्या विजयानंतर सतेज पाटलांची प्रतिक्रिया

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभा निवडणुकीचा (Rajya Sabha Election) अनुभव ताजा असल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीत (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) डोळे मिटून गप्प बसणार नाही. सुधारणा करुन महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे काँग्रेसचे नेते (Congress Leader) आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मंगळवारी केले. सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत सतेज पाटील (Satej Patil) बोलत होते.

 

जे करायचे ते रणांगणात आल्यावरच करायचं ही माझी सवय असल्याचे सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले. भाजपचे (BJP) नवनिर्वाचीत खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) यांच्या राज्यसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि महापालिका निवडणुका (Municipal Election) अद्याप लांब आहेत. ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई असते, तेव्हा आम्ही निवडणुकीत कसं उतरतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे. तसेच कोल्हापूरचा विकास करणं आणि कोल्हापुरला पुढे घेऊन जाणं, हे आमचं ठरलंय असेही त्यांनी सांगितले.

 

सतेज पाटील पुढे म्हणाले, राज्यसभेच्या अनुभवातून आम्ही अनेक गोष्टी शिकलोय, विधान परिषदेच्या निवडणुकीत कुठेही दगाफटका होणार नाही.
या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सर्वच्या सर्व आमदार (MLA) आमच्यासोबत राहतील, असा मला विश्वास आहे.
राज्यसभा निवडणुकीत अनावधानाने काही गोष्टी घडल्या आहेत. पण त्याची पुनरावृत्ती होणार नाही,
याची खबरदारी विधानपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही घेऊ, असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

 

Web Title :- Satej Patil | congress leader satej patil on vidhan parishad election and dhananjay mahadik victory in rajyasabha election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amol Mitkari | ‘अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत याचे भान हवे होते’

 

Reliance Jio Tariff Hike | Jio ने दिला मोठा धक्का ! 899 रुपयांचा झाला 11 महिने चालणारा ‘हा’ प्लान

 

Pune Pimpri Crime | पत्नीनेच पतीचा खून केला, दुसऱ्यांदा केलेल्या शवविच्छेदन अहवालातून उघड