चक्क… पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायणाची महापूजा

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

अनेक पुरोगामी चळवळीने पुण्याच्या मातीमध्ये जन्म घेतला. फर्ग्युसन महाविद्यालय देखील या चळवळीचे साक्षिदार आहे. मात्र याच महाविद्यालयात सत्यनारायणाची महापूजा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.  त्यामुळे शिक्षणालय असणाऱ्या वास्तूला देवालय बनवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आला आहे. या सत्यनारायणाच्या महापूजेला लोकतांत्रिक जनता दल संघटनेने आक्षेप घेतला आहे.

[amazon_link asins=’B01GX5513Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cfbfe4d3-a772-11e8-9925-db87b1d6d409′]

महाविद्यालयाच्या मुख्य कार्यालय असणाऱ्या इमारतीमध्ये ही महापूजा घालण्यात आली असून, एखाद्या मंदिरापुढे लावण्यात येणाऱ्या पाटीप्रमाणे बोर्ड देखील या ठिकाणी लावण्यात आला आहे. यावर सर्वांनी पुजेच्या तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असं त्याच्यावर लिहिण्यात आलं आहे.

या पुजेची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे. देश-विदेशातील सर्व जाती- धर्माचे विद्यार्थी फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेतात. मात्र फर्ग्युसनमध्ये घालण्यात आलेल्या महापूजेने काॅलेज प्रशासन धार्मिक रुढीचं उदात्तीकरण करत आहे, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.