‘कोरोना’ व्हायरस महामारीच्या दरम्यान सौदी अरबच्या हाती लागले 2 मोठे खजिने, जाणून घ्या

सौदी : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसची महामारी सुरू असताना सौदी अरबला एक मोठा खजिना सापडला आहे. सौदी अरबची सरकारी तेल कंपनी सौदी अरामकोने किंगडमच्या उत्तरेच्या भागात दोन नवे तेल आणि गॅस साठे शोधले आहेत. सौदीचे उर्जा मंत्री प्रिन्स अब्दुल अजीज यांनी अधिकृत प्रेस एजन्सीद्वारे रविवारी ही माहिती दिली.

तेल आणि गॅस साठ्यांना दिली नावे
अल-जौफ परिसरात सापडलेल्या गॅस साठ्याला हदबत अल-हजरा गॅस फील्ड आणि उत्तरेच्या सीमावर्ती भागात सापडलेल्या तेलाच्या साठ्याला अबराक अल तालूल नाव दिले आहे. प्रिंस अब्दुल अजीज यांनी प्रेस एजन्सी एसपीएशी चर्चा करताना म्हटले की, हदबत अल-हजरा फील्डच्या अल सरारा रिझरवायरमधून 16 मिलियन क्यूबिक फुट प्रतिदिनच्या दराने नैसर्गिक गॅस काढला आहे आणि यासोबत 1944 बॅरल कंडेनसेट्स सुद्धा काढले आहे.

अबरक अल-तुलूल
तर, अबरक अल-तुलूलमधून प्रत्येक दिवशी सुमारे 3,189 बॅरल अरब सुपर लाइट क्रूड निघू शकते. सोबतच 1.1 मीलियन क्यूबिक फुट गॅस निघू शकतो.

इश्वराचे मानले आभार
अरामको गॅस आणि ऑय फील्डच्या तेल, गॅस आणि कंडेंसेटच्या दर्जाची तपासणी सुरू करणार आहे. प्रिंस अब्दुल अजीज यांनी हे साठे मिळाल्याने अल्लाहचे आभार मानले.

तुर्कीला सुद्धा मिळाले होते साठे
याच महिन्यात तुर्कीने सुद्धा काळ्या समुद्रात उर्जेचे साठे शोधले होते. तुर्कीचे राष्ट्रपती रेचॅप तैय्यप अदीवान यांनी यास तुर्कीच्या इतिहासातील सर्वात मोठा नैसर्गिक गॅस साठ्याचा शोध म्हटले होते. इस्तंबुलमध्ये प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी म्हटले होते की, तुर्कीच्या फतेह नावाच्या ड्रिलिंग जहाजाला 320 अरब क्यूबिक मीटर नैसर्गिक गॅसचा साठा टूना-1 विहिरीत सापडला आहे. आमचे लक्ष्य काळ्या समुद्रातून गॅस काढून 2023 पर्यंत तो वापरण्याचे आहे. पूर्व भूमध्यसागरातून सुद्धा अशीच खुशखबर मिळू शकते. येथे सुद्धा तुर्की गॅस शोधत आहे.