पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग अकाऊंट उघडल्यावर मिळते बँकेपेक्षा जास्त व्याज, ATM आणि चेकबुकसह मिळतात अनेक सुविधा
नवी दिल्ली : वृत्त संस्था – सध्या जर तुम्ही सेव्हिंग अकाऊंट उघडण्याचा विचार करत असाल तर पोस्टात खाते उघडणे योग्य ठरेल. यामध्ये तुम्हाला बँकेच्या तुलनेत जास्त व्याज मिळते, शिवाय बँकिंगच्या सर्व सुविधा सुद्धा मिळतात. आम्ही आज तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटबाबत सांगणार आहोत.
मिळते 4 टक्के व्याज
या सेव्हिंग अकाऊंटवर 4 टक्के दराने वार्षिक व्याज मिळते. 10,000 रुपयांपर्यंत व्याज पूर्णपणे टॅक्स फ्री असते. या खात्यात केवळ 500 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम आणि चेक बुकची सुविधा सुद्धा मिळते. बचत खाते चालू स्थितीत ठेवण्यासाठी 3 आर्थिक वर्षात किमान 1 व्यवहार जरूरी आहे.
कोण उघडू शकतात खाते ?
छोट्या मुलांच्या नावावर सुद्धा हे खाते उघउता येते. 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय झाल्यानंतर तुम्ही स्वता ऑपरेट करू शकता. 2 लोकांचे जॉईंट खाते सुद्धा उघडता येते. एकापेक्षा जास्त खाती सुद्धा उघडता येतात.
कसे उघडू शकता खाते?
पोस्ट आफिसमध्ये सेव्हिंग खाते उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म पोस्ट ऑफिसशिवाय विभागाच्या साईटवरून सुद्धा डाऊनलोड करता येतो. याशिवाय केवायसी सुद्धा जरूरी आहे. फॉर्म भरून पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा. यांनतर पोस्ट ऑफिस तुमचे बचत खाते उघडते.
कोणती कागदपत्रे जरूरी ?
अॅड्रेस प्रूफसाठी मतदान कार्ड, पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, फोनचे बिल, आधार कार्ड हवे. यासोबतच लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो द्यावा लागेल.
कोणते सेव्हिंग अकाऊंट देते किती व्याज?
बँक व्याज दर (%)
इलाहाबाद बँक 3.50
बँक ऑफ इंडिया 3.25- 3.50
बँक ऑफ बडोदा 3.00- 3.25
अॅक्सिस बँक 3.50- 4.00
आयडीबीआय बँक 3.50- 4.00
एचडीएफसी बँक 3.25- 3.75
आयसीआयसीआय बँक 3- 3.50
पंजाब नॅशनल बँक 3- 3.25
बंधन बँक 4.00- 7.15
येस बँक 4- 6
इंडसइंड बँक 4- 6
एसबीआय 2.70