Advt.

PPF, EPF आणि GPF अकाऊंटमध्ये बराच ‘फरक’, याबद्दल गोंधळून जाऊ नका, जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि जनरल प्रॉव्हिडंट फंड (GPF) हे गुंतवणूकीचे उत्कृष्ट पर्याय असून कधीकधी लोक त्यांच्या नावाबद्दल गोंधळून जातात. पण या तीनही योजना वेगवेगळ्या आहेत.

योग्यता :-  EPF केवळ वेतनधारक व्यक्तींसाठी असतो. ही एक अनिवार्य बचत आहे जी २० पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीच्या कमर्चाऱ्यांसाठी लागू होते, ज्यांचे वेतन निश्चित केलेल्या किमान रकमेपेक्षा जास्त आहे.

PPF :-  हे बँका आणि पोस्ट ऑफिसकडून सगळ्यांसाठी सादर केले जाते, यात वेतनधारक असणे आवश्यक असत नाही.

योगदान :-  वेतनधारकासाठी EPF मध्ये गुंतवणूक अनिवार्य आहे. यात गुंतवणुकीसाठी बेसिक आणि डीएच्या १२ टक्क्यापर्यंत ईपीएफ खात्यात कापून जमा केले जाते.

PPF :-  ही एक ऐच्छिक सेवानिवृत्ती योजना आहे. आर्थिक वर्षात तुम्हाला किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करण्याची मुभा आहे. हे एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये देता येते.

टॅक्स सवलत :-  तुमचा ईपीएफ परिपक्व होतो तेव्हा मिळणाऱ्या रक्कमेला सवलत मिळते, जेव्हा आपल्याकडे कमीतकमी पाच वर्षांची निरंतर नोकरीचा ट्रॅक रेकॉर्ड असेल.

PPF :-  PPF ला EEE करून दर्जा प्राप्त होतो. याचा अर्थ तुमचा पीपीएफ गुंतवणूक सगळ्या स्तरांवर, कर, संचय आणि परिपक्वतेवर करमुक्त आहे.

व्याज दर :-  EPF वरील व्याजदर प्रत्येक वर्षी EPFO घोषित करतात. २०१७-१८ साठी याला ८.५५ टक्के ठरवले गेले होते.

PPF :- च्या व्याजदरात १० वर्षाचा सरकारी बॉण्ड यिल्ड आणि तीन महिन्यांच्या आधारावर बदलत जाते. २०१८-१९ च्या शेवटच्या तीन महिन्यात पीपीएफ व्याजदर ८ टक्के दराने मिळतो.

लॉक-इन पिरियड :-  EPF खात्यात पाच वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो. PPF मध्ये १५ वर्षाचा लॉक-इन कालावधी असतो.

GPF :  GPF अकाउंट एक प्रकारचा प्रॉव्हिडंट फंड आहे. सध्या यात केवळ सरकारी कर्मचारीच पैसे जमा करू शकतात. कर्मचाऱ्यांना हवे तर यादरम्यान देखील पैशांची आवश्यकता असेल तर ते काढू शकतात. यात चांगली गोष्ट अशी की, यात जमा पैसे रिटायरमेंटच्या वेळी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतात.