SBI च्या 42 कोटी ग्राहकांना ‘झटका’ ! बँकेनं बचत खात्यावरील व्याजदरात केली कपात, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे खाते भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण SBI ने आपल्या सेव्हिंग बँक डिपॉझिटवर म्हणजेच बचत खात्यातील रक्कमेवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात कपात केली आहे. याचा फटका कोट्यावधी बचत खातेदारांना बसला आहे. हे नवे नियम 1 नोव्हेंबर 2019 पासून लागू होतील.
SBI आतापर्यंत बचत खात्यावर 1 लाख रुपयांपर्यंत जमा रक्कमेवर 3.50 टक्क्यांनी व्याज देत होती, परंतू आता नव्या नियमानुसार बँक आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर 3.25 टक्के व्याज देणार आहे. बँकेने रिटेल डिपॉझिटवर 0.10 टक्के तर बल्क डिपॉझिटवर 0.30 टक्के दर कपात केली आहे.
उद्यापासून होणार गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त –
SBI ने 10 ऑक्टोबर पासून MCLR च्या दरात 0.10 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. 4 ऑक्टोबरला आरबीआयने रेपो दरात 0.25 टक्क्यांने कपात केल्याची घोषणा केली. रेपो रेट 0.25 टक्क्यांने कपात झाल्याने 5.05 टक्क्यांवर आला. यानंतर एसबीआयकडून घोषणा करण्यात आली की सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना जास्त फायदा देण्यासाठी बँक MCLR चे दर 0.10 टक्क्यांनी कमी करत आहे.
नव्या वर्षात MCLR दर 8.15 टक्क्यांनी कमी होत 8.05 टक्के झाले आहेत, नवे दर 10 ऑक्टोबरपासून लागू होतील. बँकेने चालू आर्थिक वर्षात लागोपाठ 6 व्यांदा दरात कपात केली आहे.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर