SBI ATM Franchise | घरबसल्या कमवा महिन्याला 60 हजार रुपये; जाणून घ्या ‘स्कीम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  SBI ATM Franchise | कोरोना काळात अनेकांची नोकरी गेली आहे. अनेक क्षेत्रातील लोक बेरोजगार झाले आहेत. नोकरीच्या शोधात आहेत पण ती मिळत नाही. तर दुसरीकडे अनेकांचे व्यवसायही ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये घरबसल्या काम करून चांगली कमाई करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) एटीएम फ्रँचायझी (SBI ATM Franchise) घेऊन आपण महिन्याला 60 हजार रुपयांपर्यंत कामे करू शकतो. यासाठी तुमच्या घरामध्ये 50 ते 80 चौरस फूट जागा असणं आवश्यक आहे. अतिरिक्त खर्च न करता तुम्ही एटीएम फ्रँचायझी घेऊ शकता. एका हिंदी प्रसारमाध्यमाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

एसबीआय एटीएम फ्रँचायझी (SBI ATM franchise) हवी असले तर फार काही करण्याची आवश्यकता नाही.
फक्त तुम्हाला एसबीआयने (SBI) निश्चित केलेले काही महत्त्वाचे निकष पूर्ण करावे लागतील.

 

आवश्यक कागदपत्रं –

 

अँड्रेस प्रूफ म्हणून रेशन कार्ड (Ration Card), इलेक्ट्रिसिटी बिल जमा करावं लागेल. तसंच आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड जमा करावं लागतं.
याशिवाय बँक खात्याचं पासबुक (Bank Account Passbook), फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर, GST क्रमांक, आर्थिक कागदपत्रं सादर करावी लागतात.

 

महत्त्वाच्या अटी –

 

  • ज्या ठिकाणी आपण ATM निश्चित करणार आहे ती जागा 50 ते 80 चौरस फूट असावी. त्याशिवाय त्या जागेपासून 100 मीटरपर्यंत एकही एटीएम नसावं.
  • एटीएम फ्रँचायझीसाठी जी जागा आपण निवडली आहे ती तळमजल्यावर असायला हवी.
  • एटीएम जागेवर किमान 22 तास वीजपुरवठा असावा, तसंच 1 किलोवॉटची वीज जोडणी असावी.
  • या एटीएमची क्षमता दररोज सुमारे 300 व्यवहारांची असायला हवी. महत्त्वाचे म्हणजे या जागेवर एटीएम मशीन बसवण्यापूर्वी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) घ्यावं लागेल.

 

किती कमाई?

 

एटीएम फ्रँचायझीच्या (SBI ATM franchise) माध्यमातून आपण महिन्याला 60 हजार रुपये कमवू शकतो.
हि कमाई एटीएमवर जेवढे व्यवहार होतील तेवढे कमिशन मिळते.
यासाठी रोखीने आणि नॉन कॅश ट्रान्झॅक्शनसाठी (Non Cash Transactions) कमिशन निर्धारित आहे.
रोखीसाठी आपल्याला 8 रुपये, तर नॉन कॅश ट्रान्झॅक्शनवर 2 रुपये मिळतील.
म्हणजे साधारण एटीएममध्ये दररोज 250 व्यवहार होत असतील आणि त्यापैकी 65 टक्के रोखीचे आणि 35 टक्के नॉन-कॅश व्यवहार होत असतील.
तर दर महिन्याला सुमारे 45 हजार रुपये कमावता येतील. एटीएममध्ये व्यवहार दुप्पट म्हणजेच 500 व्यवहार दररोज झाले, तर महिन्याला 90 हजार रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.
बँकेच्या निकषांनुसार दररोज 300 व्यवहार केले तर ही कमाई 60 हजार रुपये होईल.

 

कसा करावा अर्ज?

 

बँकेकडून एटीएम फ्रँचायझी (ATM franchise) देण्याबद्दलचा आदेश जारी केला जात नाही.
त्याचबरोबर एटीएम सेट करण्यासाठी बँकेकडून कोणत्याही पायाभूत सुविधा मिळत नाही.
जर आपल्याला एटीएम हवे असेल तर थर्ड पार्टी कंपन्यांशी संपर्क साधावा लागेल.
बँकेच्या थर्ड पार्टी कंपन्या निश्चित असून तीन कंपन्यांची नावे सर्वांत महत्त्वाची आहेत.
या कंपन्यांमध्ये एटीएम फ्रँचायजी मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर आवश्यक पात्रता पाहून एटीएम फ्रँचायझी तुम्हाला दिली जाते.

 

Web Title : SBI ATM Franchise | now take sbi atm franchise at your own place and earn upto 60k per month

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात पगारात होईल मोठी वाढ

Pune Crime | …म्हणून लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकले, आरोपींची कबुली

Rohit Sharma | हिटमॅन रोहितमुळं विराट कोहलीच्या ‘या’ आवडत्या खेळाडूच्या करिअरचा झाला ‘दि एन्ड’