Rohit Sharma | हिटमॅन रोहितमुळं विराट कोहलीच्या ‘या’ आवडत्या खेळाडूच्या करिअरचा झाला ‘दि एन्ड’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Rohit Sharma | भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टेस्ट सीरिजला गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरुवात होणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचा (Rohit Sharma) समावेश आहे. रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सध्या टी20 टीमचे कर्णधारपद आहे. रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध केलं आहे. इंग्लंड (England) विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये रोहितनं शतक झळकावलं होतं. भारताच्या बाहेर रोहितनं टेस्ट क्रिकेटमध्ये झळकावलेलं हे पहिलंच शतक आहे.

रोहित शर्माला टेस्टमध्येही ओपनिंगला पाठवण्याचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने घेतलेला निर्णय चांगलाच यशस्वी झाला आहे. रोहितच्या या फॉर्ममुळे आगामी दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यातही रोहितकडून (Rohit Sharma) टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच रोहित शर्मा टेस्टमध्ये ओपनर म्हणून स्थिर झाल्यानं काही खेळाडूंचं करिअर धोक्यात आलं. टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहलीचा (Virat Kohli) मित्र असलेल्या मुरली विजयचं (Murali Vijay) आंतरराष्ट्रीय करिअर यामुळे संपुष्टात आलं आहे.

विराट आणि विजयनं टेस्ट क्रिकेटमध्ये एकत्र चांगली बॅटींग केली आहे. त्यामुळे विराट आणि रोहित टेस्ट क्रिकेटमध्ये एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मुरली विजयने आतापर्यंत भारताकडून 61 टेस्ट खेळल्या आहेत. यामध्ये त्याने 12 शतकांसह 3982 रन केले आहेत. विजय 2018 साली टीम इंडियासाठी शेवटची टेस्ट मॅच खेळला आहे. त्यानंतर त्याचा फॉर्म देखील चांगलाच घसरला आहे.त्याच्या घसरलेल्या फॉर्ममुळे त्याचं आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं आहे. रोहित शर्मा सर्वात अगोदर मिडल ऑर्डरमध्ये खेळत होता. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याची क्षमता बघून त्याला सर्वप्रथम ओपनिंग करण्याची संधी दिली. या संधीचं रोहितनं सोनं केलं. वन-डे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू बनला आहे.

Web Title : Rohit Sharma | team india rohit sharma destroy murali vijay career virat kohli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा; आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या

Earn Money | ‘या’ सरकारी योजनेत केवळ 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या कशी

WBBL | टीम इंडियाच्या कॅप्टनची ऐतिहासिक कामगिरी, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली महिला