SBI मध्ये नोकरीची संधी ; ‘विशेष अधिकारी’ या पदांसाठी ५७९ जागांची भरती, अर्ज करण्याची ‘ही’ आहे प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) प्रोबेशनरी ‘विशेष अधिकारी’ या पदांसाठी ५७९ जागा भरण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १२ जूनपर्यंत आहे.

पदाचे नाव व पदसंख्या
रिलेशनशिप ऑफिसर ४८६
रिलेशनशिप मॅनेजर २०
ग्राहक प्रतिनिधी ६६

१) केंद्रीय संशोधन विभाग (Research Analyst) –
पात्रता – MBA ,PGDM
याव्यतिरिक्त, वेल्थ मॅनेजमेंटमध्ये निश्चित उत्पन्नाच्या संशोधन क्षेत्रात कमीत कमी पाच वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक
वयोमर्यादा – किमान ३० आणि जास्तीत जास्त ४५ वर्षे.
वेतन (वार्षिक)- २५ लाख ते ४५ लाख रुपये

२)रिलेशनशिप मॅनेजर (E-Wealth / NRI)

पात्रता – पदवीधर तसेच संबंधित कार्यक्षेत्रात कमीतकमी तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक
वयोमर्यादा- किमान २३ आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे
वेतन (वार्षिक)- ०६ लाख ते १५ लाख

३)ग्राहक प्रतिनिधी (Customer Representative)

पात्रता: पदवीधर तसेच एक वैध टू -व्हीलरचा लयसन्स
वयोमर्यादा- किमान २० आणि जास्तीत जास्त ३५ वर्षे
वेतन (वार्षिक): ०२ लाख ते ०३ लाख.

४) रिस्क आणि कम्प्लायन्स ऑफिसर (Risk and Compliance Officers)
पात्रता: पदवीधर आर्थिक सेवा, गुंतवणूक सल्लागार, खाजगी बँकिंग क्षेत्रात कमीतकमी तीन वर्षांचा कार्य अनुभव.
वयोमर्यादा- किमान ३० आणि जास्तीत जास्त ४० वर्षे.
वेतन (वार्षिक): १० लाख ते १५ लाख रुपये.

अर्ज भरण्याची मुदत -१२ जून

अर्ज कारण्यासाठी प्रक्रिया –

https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers SBI च्या या वेबसाइटवर रजिस्टर करावे लागेल. त्यानंतर, रजिस्टर केल्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल