SBI ने ग्राहकांना दिला झटका, MCLR वाढला; कर्ज घेणे होणार महाग, नवीन आणि जुन्या ग्राहकांना फटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून कर्ज घेणे आता महाग होणार असून नवीन आणि जुन्या ग्राहकांचा EMI देखील वाढणार आहे. हा परिणाम एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (SBI MCLR Hike) वाढवल्याने होणार आहे. बँकेने एमसीएलआरमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे आणि नवीन दर शुक्रवार, 15 जुलैपासून लागू होतील. जूनमध्येही एसबीआयने एमसीएलआरमध्ये वाढ केली होती. (SBI)

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील सर्व बँकांनी गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. आरबीआयने या वर्षी मे महिन्यात रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यानंतर जूनमध्ये रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. दोन दरवाढीनंतर रेपो दर 0.95 टक्क्यांनी वाढला असून तो आता 4.95 टक्क्यांवर पोहोचला आहे. (SBI)

 

हे असतील नवीन दर
मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, एसबीआयने एमसीएलआर वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की एक वर्षाच्या कर्जासाठी एमसीएलआर 7.40 वरून 7.50 टक्क्यांवर पोहोचला आहे. सहा महिन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआर 7.35 वरून 7.45 टक्के करण्यात आला आहे. त्याच वेळी, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी एमसीएलआर 7.70 टक्क्यांवरून 7.80 टक्के करण्यात आला आहे. एसबीआय या वर्षी एप्रिलपासून एमसीएलआर वाढवत आहे. जूनमध्ये, त्याने एमसीएलआर 20 बेसिस पॉइंट्सने वाढवला होता.

इतर बँकांनीही वाढवला MCLR
अलीकडच्या काळात अनेक बँकांनी एमसीएलआर वाढवला आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेनेही एमसीएलआर दर वाढवले आहेत.
एचडीएफसीने सर्व मुदतीच्या कर्जासाठी एमसीएलआर वाढवला आहे.
आयसीआयसीआय बँकेने सर्व मुदतीच्या कर्जासाठी एमसीएलआर 20 बेस पॉईंटने वाढवला आहे.

 

MCLR म्हणजे काय?
बँकांच्या कर्जासाठी MCLR हा बेंचमार्क असतो. यात वाढ झाल्यामुळे कर्जाचा व्याजदर वाढतो.
यामध्ये घट झाल्यास कर्जाचा दर कमी होतो. नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मे आणि जूनमध्ये रेपो दरात वाढ केली होती.
त्यानंतर सर्व बँकांनी त्यांच्या एमसीएलआरमध्येही वाढ केली आहे.

 

Web Title :- SBI | sbi hikes mclr 10 basis points your loan emi will increase

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Pratap Sarnaik | ‘…म्हणून नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा, उल्हासनगरातील 18 नगरसेवक शिंदे गटात सामील’ – प्रताप सरनाईक

 

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व मनपा व खासगी शाळा उद्यापासून (दि.15) नियमित सुरू

 

Scholarship Exam | प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलै रोजी