ग्राहकांना ५ लिटर पेट्रोल मोफत देण्याची एसबीआयची धमाकेदार आॅफर 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल डिझेलचे दर ज्या अर्थी उच्चंकी गाठत आहेत, त्यावरून आता हे इंधन देखील मौल्यावान गोष्टींपैकींच एक होणार की काय असे वाटते आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांकरिता जबरी ऑफर आणली आहे. एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरल्यास ग्राहकांना ५ लिटर पेट्रोल मोफत मिळू शकतं. यासाठी केवळ एकच अट ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे पेट्रोल भरल्यानंतर पैसे देताना तुम्हाला ‘भीम’ अॅपचा वापर करुन एसबीआय बँकेतून आर्थिक व्यवहार करणं आवश्यक आहे. याबातची माहिती एसबीआयच्या संकेतस्थळावर दिली आहे.

काय आहे प्रक्रिया 
* इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कोणत्याही पंपावरुन पेट्रोल भरावे लागेल.
 * पेट्रोलचे बिल देण्याकरिता भीम अॅपद्वारे एसबीआय बँकेतून आर्थिक व्यवहार करावा लागेल.
* या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान १०० रुपयांचं पेट्रोल भरावं लागेल.
* त्यानंतर भीम अॅपद्वारे केलेल्या या १००  रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा नंबर लिहून ९२२२२२२०८४ या नंबरवर एसएमएस करावा लागणार आहे.
* (भीम अ‍ॅपद्वारे पेमेंट केल्यानंतर पेमेंट नंबर <UPI Reference No. (12-Digit)> <DDMM> टाईप करून ९२२२२२२०८४ या फोन नंबरवर SMS पाठवा. या SMSसाठी नॉर्मल चार्जेस लागतील.)
* त्यानंतर जर तुमचा नंबर निवडण्यात आला तर तुमच्या मोबाइक क्रमांकावर मेसेजद्वारे कळवलं जाईल आणि तुम्ही ४०० रुपये कॅशबॅक म्हणजेच जवळपास 5 लिटर पेट्रोल मोफत मिळवू शकणार आहात.
* २३ नोव्हेंबर २०१८ पर्यंत ही ऑफर सुरू असणार आहे.
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि भीम अॅपच्या युजर्सची संख्या वाढविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच ‘BHIM’ होय. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हे अॅप बनवले आहे.