SBI WECARE | खास ग्राहकांना FD वर मिळेल 0.80 टक्के जास्त व्याज, मार्च 2022 पर्यंत आहे गुंतवणुकीची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   SBI WECARE | स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना संकटात मे 2020 मध्ये स्पेशल फिक्स्ड डिपॉझिट स्कीम (Fixed Deposit) सुरू केली होती. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) अतिरिक्त 0.30 टक्के व्याज (Higher Return) दिले जाते. या योजनेचे नाव एसबीआय वुई केयर डिपॉझिट स्कीम (SBI WECARE Deposit Scheme) आहे. ही योजना सप्टेंबर 2021 मध्ये समाप्त होणार होती, जी आता 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. एसबीआयने या योजनेचा कालावधी पाचवेळा वाढवला आहे.

5 वर्ष किंवा जास्तीच्या जमावर मिळेल फायदा

यामध्ये सीनियर सिटीझन्सला एफडीवर 0.30 टक्के जास्त व्याज मिळते. या योजनेचा लाभ घेऊन सीनियर सिटीझन्स आपल्या एफडीवरर 0.80 टक्के व्याजदर मिळवू शकतात. एसबीआय वुई केयरमध्ये 60 वर्ष किंवा यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती गुंतवणूक करू शकतात. योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी आहे.

कमाल डिपॉझिट रक्कम दोन कोटीपेक्षा कमी आहे. मॅच्युरिटी पूर्वी पैसे काढल्यास व्याज मिळत नाही. एसबीआय (SBI WECARE) पाच वर्षाच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 5.40 टक्के व्याजदर देते. जर कुणी सीनियर सिटीझन स्पेशल एफडी योजने अंतर्गत एफडी करत असेल तर त्यास 6.20 टक्के व्याजदर दिला जातो.

2 कोटीपेक्षा कमीच्या जमावर मिळेल लाभ

एसबीआय सामान्यपणे ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 5.90 टक्के वार्षिक व्याज मिळते. आता ज्येष्ठ नागरिकांनी वुई केयर डिपॉजिट स्कीममध्ये (SBI WECARE) एफडी केली तर त्यांना 0.30 टक्के जास्त व्याज (Additional Interest) मिळेल.

म्हणजेच 5 वर्षाच्या एफडीवर 6.20 टक्के वार्षिक व्याज मिळेल. हे दर 8 जानेवारी 2021पासून प्रभावी आहेत. हे व्याजदर रिटेल टर्म डिपॉझिट म्हणजे 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या जमावर आहे.

 

 

एसबीआय वुई केयरसाठी व्याजदर

– ज्येष्ठ नागरिकांना 7-45 दिवसांच्या डिपॉझिटवर 3.4 टक्के व्याज मिळेल.

– याशिवाय 46-179 दिवसाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 4.4 टक्के व्याजदर लागू आहे.

– एसबीआय 180-210 दिवसाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 4.9 टक्के देत आहे.

– 211 दिवसापासून 1 वर्षापेक्षा कमी कलावधीसाठी डिपॉझिटवर 4.9 टक्के व्याज मिळेल.

– 1 वर्षापासून 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 5.5 टक्के व्याज दिले जाईल.

– स्टेट बँक 2 वर्षापासून 3 वर्षापेक्षा कमीच्या जमावर 5.6 टक्के व्याज देत आहे.

– याशिवाय 3 वर्षापासून 5 वर्षापेक्षा कमीच्या डिपॉझिटवर 5.8 टक्के व्याजदर आहे.

– सर्वात जास्त 6.20 टक्के व्याज 5 पासून 10 वर्षापर्यंतच्या डिपॉझिटवर मिळेल.

 

Web Title : SBI WECARE | sbi wecare deposit scheme senior citizens can get more return of fixed deposits check details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MSEDCL | पश्चिम महाराष्ट्रात 5.64 कोटींच्या वीजचोरीचा पर्दाफाश, पुणे जिल्ह्यात 889 ठिकाणी 81 लाखांची विजचोरी उघड

Deepak Ramchandra Mankar | राष्ट्रवादीचे निष्ठावान आणि पवार कुटुंबाचे निकटवर्ती दीपक मानकर यांचे निधन

Indrani Balan Foundation | इंद्राणी बालन फाउंडेशनच्या पुढाकारातून काश्मीरच्या बारामुल्लामध्ये डॅगर परिवार स्कूलचे उद्घाटन