SBI कडून देशातील पहिले RuPay क्रेडिट कार्ड लवकरच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय लवकरच नवीन क्रेडिट कार्ड लाँच करणार आहे. यामुळे पेमेंट नेटवर्क मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. सध्या देशभरात व्हिजा आणि मास्टरकार्ड मोठ्या प्रमाणात चालत असून यामध्ये अमेरिकन कंपन्या या कार्डांना संचालित करतात. त्यामुळे एसबीआय लवकरच रूपे क्रेडिट कार्ड बरोबरच व्हिजा आणि मास्टरकार्ड देखील लाँच करणार आहे. यामुळे विदेशात मोठ्या प्रमाणात जाणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

राष्ट्रवादी ग्राहकांची मागणी
एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ हरदयाल प्रसाद यांनी याविषयी बोलताना सांगितले कि,लवकरच हे कार्ड लाँच करणार आहोत. त्याचबरोबर हे कार्ड मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होणार असून अनेक लोकं याचा वापर करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी सांगितले कि, देशातला एक मोठा राष्ट्रवादी गट या रूपे कार्डची मागणी देखील करत होता. त्यामुळे असे ग्राहक केवळ रूपे कार्डची मागणी करत असल्यामुळे आम्ही हे लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान मोदींनी केले यूएईमध्ये उदघाटन
रूपे हे भारतातील पहिली अशी पेमेंट प्रणाली आहे जि नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडियाने तयार केली आहे. सध्या हे रूपे कार्ड भूतान आणि सिंगापूरसह काही देशांमध्ये स्वीकारले जात असून नुकतेच यूएईमध्ये पंतप्रधान मोदी यांनी उदघाटन केले होते. त्यामुळे विविध देशांशी टायअप करून या रूपे कार्डचा विदेशात देखील वापर वाढवण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.

आरोग्यविषयक वृत्त –