जाणून घ्या SBI Zero Balance सेव्हिंग अकाउंटचे फायदे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Zero Balance | आजकाल बहुतेक बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सचा नियम आहे. त्यामुळे बँकेने ठरवून दिलेली रक्कम खात्यात कायम शिल्लक ठेवावी लागते. परंतु स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन वैध केवायसी पूर्ण करून झिरो बॅलन्स खाते सुद्धा उघडू शकता. परंतु या खात्याचे काही फायदे असले तरी काही मर्यादा सुद्धा आहेत. (SBI Zero Balance)

 

एसबीआय झिरो बॅलन्स खात्याचे फायदे आणि मर्यादा

या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही.

खात्यात पैसे ठेवल्यास कोणतीही कमाल मर्यादा नाही.

खातेदाराला बेसिक रुपे एटीएम-कम-डेबिट कार्ड जारी केले जाते.

रुपे कार्डवर वार्षिक शुल्क नाही.

चेकबुक दिले जात नाही.

एटीएममधून किंवा शाखेत फॉर्म भरून बँकेतून पैसे काढता येतात.

एनईएफटी/आरटीजीएस सारख्या इलेक्ट्रॉनिक चॅनेलद्वारे पैसे घेणे किंवा हस्तांतरित करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

बंद खाते सक्रिय केले तर पैसे द्यावे लागणार नाहीत.

खाते बंद केल्यास कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

 

…तर एक खाते बंद करावे लागेल
आधीच झिरो बॅलन्स किंवा बेसिक सेव्हिंग खाते असल्यास दुसरे कोणतेही बचत खाते असू नये. आधीपासूनच बचत खाते असेल आणि शून्य शिल्लक बचत खाते सुद्धा उघडले तर पूर्वीचे खाते 30 दिवसांच्या आत बंद करावे लागेल. झिरो बॅलन्स सेव्हिंग खातेधारक त्यांच्या बँक किंवा इतर बँकेच्या एटीएम किंवा शाखा चॅनेलमधून एका महिन्यात 4 वेळा पैसे काढू शकतात.

 

Web Title :- SBI Zero Balance | know about sbi zero balance saving account

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Water Supply | पुणेकरांना दिलासा ! बकरी ईद व आषाढी एकादशीमुळे पुण्यातील पाणी कपातीच्या वेळापत्रकात बदल

 

Mukhtar Abbas Naqvi | मुख्तार अब्बास नक्वींचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा, उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळणार ?

 

Pune Crime | पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 81 लाखाचा मुद्देमाल जप्त