Sree Padmanabhaswamy Temple: पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्रशासनात राहतील त्रावणकोर राजघराण्याचे अधिकार

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिर व्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय दिला, त्यानुसार मंदिर व्यवस्थापनात त्रावणकोरच्या राजघराण्यातील अधिकारांना मान्यता देण्यात आली आहे. तिरुअनंतपुरमच्या जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समिती सध्या मंदिराच्या व्यवस्थेचे निरीक्षण करेल. त्रावणकोर राज परिवाराचे अपील कोर्टाने मान्य केले.

उल्लेखनीय आहे की, पद्मनाभस्वामीचे मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. आपल्या तिजोरीतून बाहेर आलेल्या सुमारे एक लाख कोटींची मालमत्ता आणि दागिने हे चर्चेत आले होते. आत्ता त्या तिजोरी म्हणजे वॉल्ट बी उघडलेला नाही. त्रावणकोर राज परिवाराचे सेवा हक्क सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहेत.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये न्यायमूर्ती यू ललित आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. त्रावणकोरच्या रॉयल फॅमिलीने केरळ हायकोर्टाच्या 2011 च्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या निकालात कोर्टाने श्री पद्मनाभस्वामी मंदिर प्रशासन व राज्य सरकारकडून मालमत्ता संपादन करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाने मंदिराची सर्व तळघर उघडण्याचे आदेशही दिले होते.

केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर भगवान विष्णूचे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारतातील प्रमुख वैष्णव मंदिरांमध्ये समाविष्ट आहे. यासह या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्वही आहे. पद्मनाभ स्वामी मंदिर हे विष्णू भाविकांचे एक महत्त्वाचे मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर 1735 मध्ये त्रावणकोरच्या महाराजा मारताड वर्मा यांनी पुन्हा बनवले. या मंदिराशी संबंधित एक आख्यायिका आहे, असे म्हणतात की या ठिकाणी भगवान विष्णूची मूर्ती सापडली होती, त्यानंतर मंदिर बांधले गेले.