स्कुल बसमध्ये 15 वर्षाच्या विद्यार्थीनी सोबत केले चालकाने अश्लिल चाळे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेच्या स्कूल बस चालकाने बसमध्ये विद्यार्थीनीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बस चालकावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

दिलीप पांडुरंग काळे (२४, रा. पद्मावती मंदिराजवळ, चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप काळे हा इंद्रायणीनगर येथील एका शाळेच्या स्कूलबसचा चालक आहे. शनिवारी (दि. 14) विद्यार्थिनीला घेण्यासाठी काळे बस घेऊन घरासमोर गेला. विद्यार्थिनी बसमध्ये आल्यानंतर तिच्या अंगाशी लगट साधली. जबरदस्तीने तिचा हात हातात धरून तिच्याशी अश्लिल वर्तन केले. त्यानंतर शाळेच्या बाहेर बस उभी असताना देखील काळेने तिच्याशी अश्लिल वर्तन करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, असे तक्रारीत नमूद आहे.

हा प्रकार घरच्यांना सांगितला तर आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देखील त्याने दिली. हा प्रकार मुलीने तिच्या घरच्यांना सांगितल्यानंतर बसचालक काळेच्या विरोधात पोलिस तक्रार दिली. एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/