एसटी खाली सापडून विद्यार्थिनीचा मृत्यू 

सातारा  : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कराड- ढेबेवाडी रस्त्यावर एसटीखाली सापडून एका विद्यार्थिनीचा मृत्य झाल्याची माहिती मिळते आहे. समृद्धी भरत कदम असे या मुलीचे नाव आहे. इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या या मुलीचा आज सकाळी एस टी खाली सापडून अपघात झाला या अपघातात तीचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास  कराड- ढेबेवाडी रस्त्यावर गुढे फाट्यानजीक हा अपघात घडला. समृद्धी कदम इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी असून सकाळी ती शिकवणी करिता जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान एस टी मध्ये चढता असताना हा अपघात झाला.  या अपघातात तिचा मृत्यू झाला. यावेळी तिला तातडीने रुग्नालयात नेण्यात आले मात्र या अपघातामुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान या मुलीच्या मृत्यूचे वृत्त समजताच तिच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.