दहशतवाद्यांना सुरक्षा जवानांचा घेराव

ADV
श्रीनगर : वृत्तसंथा

काश्मीर खोऱ्यातील बटमालू येथे सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासूनच चकमक सुरू आहे. सुरक्षा रक्षकांनी लष्कर कमांडर नवीद जट्ट यास घेराव घातला असून या चकमकीत एका जवानास वीरमरण प्राप्त झाले आहे. तर काश्मीरमधील एक पोलीस आणि सीआरपीएफचे दोन जवान जखमी आहेत. काश्मीरचे डीजीपी एसपी वैद्य यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.

[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’39ce4d64-9df5-11e8-8a2c-21af35f0f38f’]

ADV

जम्मू आणि काश्मीरमधील बटमालू येथे मध्यरात्री दहशवाद्यांनी सुरक्षा जवानांवर हल्ला चढवला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यास जवानांनीही जशास तसे उत्तर दिले. बटमालू येथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती, त्यानुसार स्थानिक पोलीस आणि सुरक्षा जवानांनी संयुक्तपणे कारवाई करत दहशतवाद्यांचा सामना केला. सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना घेराव घातल्यानंतर त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर जवानांनीही गोळीबार केला.

या चकमकीत स्पेशल आॅपरेशन ग्रुप चा एक जवान शहीद झाला आहे. अजूनही  आॅपरेशन सुरुच असून दहशतवाद्यांना घेराव घातला आहे.