आम्ही जनतेचे रक्षक मात्र आमच्या घराचे तुम्हीच खरे रक्षक : नम्रता पाटील

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

आम्ही जनतेचे रक्षण करण्यासाठी २४ तास फिरत असतो, त्यावेळी आमचा परिवार हा घरीच असतो. अश्यावेळी आमच्या घराच्या सुरक्षेची जबाबदारी ही तुमच्यावर म्हणजेच खासगी सुरक्षा रक्षकांवर असते. त्यामुळे हे सुरक्षा रक्षक शारीरिक तंदुरुस्त असणे गरजेचे आहे तसेच त्यांना सर्व सुख सुविधा पुरविण्याचे काम त्या सोसायटीचे असल्याचे मत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी व्यक्त केले.
वाकड पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षा रक्षक यांना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’46ccf98d-c633-11e8-a6a6-d542f1bc0407′]

बालाजी सोसायटी कॉलेजच्या हॉलमध्ये झालेल्या या शिबिरास सुमारे ७०० सुरक्षा रक्षक व सुरक्षा रक्षक संस्था मालक, सुपरवायझर, २००  हौसिंग सोसायटी सदस्य, सुरक्षा उपस्थित होते. तसेच  सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, शिवाजी गवारे, शिंदे, सुनील पिंजण उपस्थित होते.

वाकड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे ३५० सोसायट्या आहेत , बऱ्याच वेळा सुरक्षा रक्षक असताना सुद्धा चोऱ्या झाल्याचे उघड झाले आहे, तरी सुरक्षा रक्षक संस्थांनी सुरक्षा रक्षकांची चारित्र्य पडताळणी न केल्याने सुद्धा सुरक्षरक्षकानेच चोरी केल्याचे लक्षात आले. तसेच सुरक्षा रक्षकांना चेकिंग बाबत कागपत्र तपासणी बाबत , सी सी टी व्ही कॅमेरे  बाबत, आगीचे वेळी, लिफ्ट अपघाताचे वेळी तात्काळ उपाययोजना काय कराव्या या बाबत प्रशिक्षण नसल्याचे लक्षात आले. सुरक्षा रक्षक व्यवसाय करण्यास लायसनची जरुरी असते, सदर लायसन न घेता अनेकजण व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. सहकारी गृहनिर्माण संस्था मधील अध्यक्ष, सेक्रेटरी सुद्धा सुरक्षारक्षक यांचेवर सर्व जबाबदारी सोपवून रिकामे होतात व इतर कामात गुंतवतात, या सर्व  विषयांवर उपाययोजना कशा करता येतील याकरिता पोलीस आयुक्त आर. के. पदमनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांचे सूचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.

एसी बसचे भाडे २५ टक्क्यांनी कमी

या शिबिराची प्रस्तावना करताना सुरक्षा रकक्षकांनी कामाच्या ठिकाणी  काय करावे व काय करू नये तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करून घेता येईल व गृहनिर्माण सोसायट्या यांचे सौरक्षण कसे करता येईल यावर मार्गदर्शन केले. तसेच शरद श्रीवास्तव ( गुन्हे प्रतिबंधक तज्ञ) यांनी सुरक्षा रक्षकांनी घ्यावयाची काळजी तसेच आधुनिक सुरक्षा व्यवस्था यावर श्री चिपाडे अग्निशामक अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा यांनी आग लागल्यावर प्राथमिक उपाययोजना काय करावे या विषयावर मार्गदर्शन केले. रॉनी चौधरी सर्व्हिस मॅनेजर ओटीस कंपनी यांनी लिफ्ट अपघाता बाबत तातडीची उपाययोजना काय या बाबत मार्गदर्शन केले. झवर यांनी सी सी टी व्ही कॅमेरे यांचा योग्य पद्धतीने कसा वापर केला जाऊ शकतो या विषयावर मार्गदर्शन केले.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’356b3ee4-c634-11e8-957b-b7f99fc51629′]