TV-चित्रपटाच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारची नवी नियमावली जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीव्ही आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारने विस्तृत अशा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. या मार्गदर्शक सूचनांमुळे शूटिंगमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यात मदत होणार असल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

या सूचनांमध्ये सर्व ठिकाणी फेस मास्कचा वापर आणि शारीरिक अंतर राखणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, या सूचना कलाकारांवर लागू होणार नाहीत. या सूचनांनुसार सीटिंग, कॅटरिंग, क्रू पोझिशन्स, कॅमेरा लोकेशनमध्ये योग्य ते अंतर राखावे लागणार आहे. रेकॉर्डिंग स्टूडिओ, एडिटिंग रूममध्ये देखील सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. सध्या सेट्सवर दर्शकांना जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

काय आहेत नव्या मार्गदर्शक सूचना ?

1. कॅमेऱ्यासमोर कलाकार यांना सोडून सर्वांसाठी फेस कव्हर्स/ मास्क अनिवार्य
2. मेकअप आर्टिस्ट, हेयर स्टायलिस्ट्स पीपीईचा वापर करणार
3. प्रत्येक ठिकाणी 6 फूटांचे अंतराचे पालन करावे
4. विग, कॉस्ट्यूम आणि मेकअपची शेयपरिंग कमी करावी लागणार
5. शेअर करण्याजोग्या वस्तूंचा वापर करताना ग्लोव्हज घालणे आवश्यक
6. माइकच्या डायप्रामशी थेट संपर्क ठेवू नये
7. प्रॉप्सचा वापर कमीतकमी व्हावा, वापरानंतर सॅनिटायझेशन आवश्यक
8. शूटिंगवेळी कास्ट अँड क्रू कमीतकमी असावेत
9. शूट लोकेशनवर एंट्री/एग्झिटचे वेगवेगळे मार्ग असावेत
10. व्हिजिटर्स/दर्शकांना सेटवर जाण्याची परवानगी नाही.

कमीत कमी संपर्क असावा हेच लक्ष्य

एससओपी शूटींगची स्थाने आणि इतर कामाच्या ठिकाणी योग्य ते अंतर राखले जाणे अत्यंत आवश्यक आहे, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. तसेच योग्य स्वच्छता, गर्दीचे नियोजन आणि सुरक्षात्मक उपकरणांसाठी तरतुदींसह उपायांचा समावेश आहे. कमीत कमी संपर्क, एसओपीमध्ये मूलभूत आहे, असे ट्विट जावडेकर यांनी केले आहे.