पुणे ग्रामीणमधून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात कोणाची लागली लॉटरी…. पहा 

ADV

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाचे प्रशासकीय कामकाज पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन हे उद्यापासून अधिकृतरित्या सुरू करणार आहेत. यापार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांकडून तेवीस अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे. यामध्ये चार पोलीस निरीक्षक, सहा सहायक निरीक्षक, तेरा उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी आदेश काढले आहेत.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f2cd29c-9fe0-11e8-876f-7b45c02600ca’]

पोलीस निरीक्षक धन्यकुमार चांगदेव गोडसे, प्रकाश गणपतराव धस, अमरनाथ रामचंद्र वाघमोडे, मुगुटलाल भानुदास पाटील, सहायक निरीक्षक साधना शंकरराव पाटील, तृप्ती बाजीराव बोराटे, शाहिद सय्यद पठाण, नवनाथ बिभीषण रानगट, उद्धव रायसिंग खाडे, अजित धोंडीराम दळवी यांना वर्ग करण्यात आले आहे.

उपनिरीक्षक संजय धोंडीराम निलपत्रेवर, कमलाकर किसनराव भोसले, बजरंग राणूसिंग बाडीवाले, हनुमंत शंकर काटकर, जालिंदर आबाजी जाधव, सुजातअली लिआयतअली इनामदार, सतीश ए. डोले, विक्रम रामचंद्र पासलकर, प्राची गोरख तोडकर, अबूबकर म्हमुलाल लांडगे, दिलीप नारायण कोंडेदेशमुख, अरविंदकुमार भिमराव हिंगोले आणि संतोष लांडे या सर्व अधिकाऱ्यांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयात वर्ग करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयासाठी अतिरीक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्तपदी स्मार्थना पाटील, नम्रता पाटील, विनायक ढाकणे यांची तर सहायक पोलिस आयुक्तपदी सतीश पाटील, श्रीधर जाधव, चंद्रकांत असलटवार यांची नेमणूक झाली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95d27b4c-9fe0-11e8-8758-7b430f073138′]

पुणे ग्रामीण मधून देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, चाकण आणि आळंदी पोलीस ठाणे आयुक्तालयात वर्ग झाले आहे. मात्र यातील सर्व अधिकारी वर्ग केले नाहीत. जे अधिकारी वर्ग केले नाहीत त्यांना पुणे ग्रामीण मुख्यालयात उद्या हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.