तासगावात १००% अनुदानावर वैरण बियाणे उपलब्ध

तासगाव | पोलीसनामा आॅनलाइन – तालुक्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून दुष्काळाचा सामना करण्याची तयारी करण्यात आली आहे. संभाव्य चारा टंचाई कमी करण्याकरीता १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे व वितरण ही योजना तासगाव तालुक्यात सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन पंचायत समिती पशुवैद्यकीय अधिकारी अलका ढोके यांनी केले. तालुक्यातील सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालक व शेतकरी यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
यावेळी बोलताना अलका ढोके म्हणाल्या, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून चाऱ्यासाठी आफ्रिकन टॉल मका बियाणे व ज्वारी (फुले रेवती) या वैरण पिकांच्या बियाणाचे वितरण करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी, पशुपालक यांना उपलब्ध सिंचन सुविधेनुसार व बियाणे उपलब्धतेनुसार साठा असेपर्यंत १० गुंठे क्षेत्रासाठी मका बियाणे ५ किलो किंवा ४ किलो ज्यारी बियाणे  वाटप करणेत येणार आहे. तसेच १ हेक्टर क्षेत्रासाठी मका ५० किलो व ज्वारी बियाणे ४० किलो वाटप केले जाणार आहे.

या योजनेसाठी ७/१२ उतारा तीन महिन्याच्या आतील व सिंचन सुविधा उपलब्ध असलेबाबत दाखला आवश्यक आहे.
या योजनेच्या अधिक माहिती व या योजनेचा अर्ज स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना व पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, तासगांव येथे उपलब्ध आहे. 24 नोव्हेंबर पासून अर्ज स्वीकारले जातील, याचा लाभ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन ढोके यांनी केले आहे.

विखे पाटलांच्या ‘त्या’ विधानामुळे काँग्रेसची पंचाईत 

You might also like