खळबळजनक ! त्यानं धारदार सुऱ्यानं प्रेयसीचा खून करून स्वत:च्या गळ्यावर केले वार, पुढं झालं ‘असं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एका दुकानात 22 वर्षीय प्रेयसीचा गळा चिरून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यानंतर सदर आरोपी प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाईंदर पूर्व येथील ही घटना आहे.

चंदन आचार्य याचं तलाव मार्गावर बाळकृष्ण लिला इमारतीत महालक्ष्मी डेअरी व जनरल स्टोर्सचं दुकान आहे. चंदन मुंबईला गेला होता. यानंतर त्याचा भाऊ कुंदन आचार्य हा दुकानात बसला होता. यानंतर त्याची प्रेयसी अंकिता दुकानात आली. यानंतर दोघांमध्ये प्रचंड भांडण झालं रागाच्या भरात कुंदनने धारदार सुऱ्याने अंकिताच्या गळ्यावर वार केले आणि तिचा गळा चिरला. यानंतर त्याने आत्महत्येच्या हेतूने त्याने स्वत:च्या गळ्यावर सुरा फिरवला. अंकिता ही समोरच्याच शालीभद्र इमारतीत राहते.

कुंदनने स्वत:च्या गळ्यावर वार केल्यानंतर तो दुकानाबाहेर रक्ताच्या थोरळ्यात आढळून आला. नेमका काय प्रकार घडला हे समजल्यानंतर लोक त्याला हात लावायला तयारच नव्हते. परंतु काही तरुणांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत अंकिताचा जागीच मृत्यू झाला. कुंदनच्या श्वासनलिकेला छेद गेला. सध्या त्याचीही स्थिती गंभीर आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपअधिक्षक शशीकांत भोसले, नवघरचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग आदी पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. कुंदनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 ते 6 वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. इतकेच नाही तर दोघांबद्दल अंकिताच्या घरच्यांना कल्पना होती. अंकिता सतत लग्नासाठी आग्रह करत होती. तिच्या घरचे मात्र लग्नासाठी राजी नव्हते असेही त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजत आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like