येवला-मनमाड रोडवर ट्रक आणि कारचा भीषण अपघात ; एकाच कुटूंबातील ६ जणांचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन – येवला-मनमाड रोडवर अनकाई बारी येथे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटूंबातील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मृतांमध्ये ३ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. अनकाई बारी जवळील ही दुर्घटना घडली.
जयंत सिन्हा यांच्या निवासस्थानात घुसले १८ हत्ती
हजारीबाग : केंद्रीय राज्य मंत्री जयंत सिन्हा यांच्या घरात मध्यरात्री १८ हत्ती घुसले. या हत्तींनी त्यांच्या घराची आणि परिसरातील वस्तूंची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली आहे. सिन्हा यांच्या घराची भिंत तोडून हत्ती घरात घुसले. घरात शिरल्यानंतर हत्तींनी घरातील वस्तूंची मोडतोड केली. हा प्रकार जवळजवळ तासभर सुरू होता. सिन्हा यांच्या घरातील कामगाराने सांगितले की, १८ हत्तीचा कळप रात्री १२ वाजताच्या सुमारास घराची सुरक्षा भिंत तोडून रस्त्याने घरात शिरला. यावेळी हत्तींनी घराचे आणि आसपासच्या परिसरात मोठी नासधूस करत पिकांचे मोठे नुकसान केले. घटनेनंतर सिन्हांच्या घराजवळील मंदिरापासून हत्तींचा कळप जंगलात निघून गेला. या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. जयंत सिन्हा यांचे घर हजारीबाग शहरापासून १० किमी अंतरावर आहे. तसेच त्यांचे घर चारही बाजूंनी जंगलाने वेढलेले असल्याने हत्तींचा कळप घरात शिरू शकला, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.