पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, ३ तरुणींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील बाणेर परिसरातील हॉटेलसमोर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. देहविक्रय व्यवसायासाठी तरुणी पुरविल्या जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी ३ तरुणींची सुटका केली आहे. तर त्यांच्याकडू देह विक्रय करून घेणाऱ्या एजंट महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

राबीया उर्फ सोनाली इंदादूल मंडल असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात इटपा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथे देह विक्रय करण्यासाठी तरुणी पुरविल्या जातात. त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना या व्यवसायात ढकलण्यात आले आहे. अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस कर्मचारी नरेश बलसाने यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बाणेर रोड वरील हॉटेल ग्रीन पार्क च्या गेटसमोर छापा टाकला. त्यावेळी राबीया उर्फ सोनाली इंदादूल मंडल ही ३ तरुणींकडून देह विक्रय करून घेत सेक्स रॅकेट चालवत असल्याचे सुत्रांकडून समजले.

पोलिसांनी तीनही तरुणींची सुटका करून त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना व्यवसायाकरता आणल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी राबीया हीला अटक केली आहे. तर ३ तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी महंमदवाडी येथील रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे. यातील १ तरुणी गुजरात येथील तर इतर २ तरुणी मुंबई येथील आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे, सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेलार, कर्मचारी राजाराम घोगरे, ज्ञानेश्वर देवकर, नरेश बलसाने, कर्मचारी तुषार आल्हाट, निलेश पालवे, महिला कर्मचारी गितांजली जाधव, सुप्रिया शेवाळे, रुपाली चांदगुडे यांच्या पथकाने केली.