कोंढवा येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने हडपसर येथील एका फ्लॅटवर छापा टाकून दोन सज्ञान मुलींची सुटका केली. पैशांचे अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करवून घेणा-या एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई हेवन पार्क, जरांडे नगर, महंमदवाडी, हडपसर येथे गुरुवारी (दि.१४) रात्री करण्यात आली.

या कारवाईत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने महाराष्ट्रातील दोन सज्ञान मुलींची सुटाक केली असून त्यांना रेस्क्यु होम, महंमदवाडी येथे ठेवण्यात आले आहे. तर याप्रकरणी वेश्या व्यवसाय चालक धनंजय पांडुरंग सुर्यवंशी (वय-३८, रा. महंमदवाडी, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे.

हडपसर येथील महंमदवाडीतील एका फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस नाईक नितीन तेलंगे यांना मिळाली. मिळेलेल्या माहितीची खातरजमा करुन पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून दोन मुलींची सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी रोख ३ हजार रुपये, मोबाईल, लाईट बील असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे प्रदिप देशपांडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शितल भालेकर, नितीन तेलंगे, नामदेव शेलार, राजाराम घोगरे, रमेश लोहकरे, गीतांजली जाधव, कविता नलावडे, तुषार आल्हाट, नितीन लोंढे, सचिन कदम, रेवनसिद्ध नरोटे, संदीप गायकवाड, सुनिल नाईक, सचिन शिंदे, रुपाली चांदगुडे यांनी केली.