विमाननगर येथील थाई स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील विमाननगर परिसरात असलेल्या औरा थाई स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ विदेशी मुलींसह २ भारतीय मुलींची सुटका करण्यात आली. ही कारवाई रविवारी (दि.७) रात्री सव्वा नऊच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’803bc54f-cacc-11e8-9f69-9fcdb8d8bafb’]

स्वप्नील संजय गायकवाड (वय-३३ रा. स्वप्न नगरी अपार्टमेंट, सिंहगड रोड,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रोझ ओकेंद्रसिंग खैदेम (वय-२७ रा. पॉप्युलर हाईट, कोरेगाव पार्क, मुळ रा. मणिपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उप निरीक्षक चित्रा चौधरी यांनी फिर्याद दिली आहे.

विमाननगर येथील स्काय मॅक्स बिल्डींगमधील औरा थाई स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती विमाननगर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा करुन घेतली. डमी ग्राहकाने वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे सांगितल्यनंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकून ४ थायलंड येथील मुलींची तर मेघालय येथील २ मुलींची सुटका केली करुन स्वप्नील गायकवाडला अटक केली. पैशांचे अमिष दाखवून गायकवाड हा मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता.

पिंपरी : आंबी येथे भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून पावणे चार लाख लंपास

सुटका करण्यात आलेल्या थायलंड येथील मुली या टूरिस्ट व्हीजावर भारतात आल्या होत्या. त्यांना काम देण्याच्या बहाण्याने आणि पैशांचे अमिष दाखवून मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेण्यात येत होता अशी माहिती विमाननगर पोलिसांनी दिली. पुढील तपास विमाननगर पोलीस करित आहेत.

[amazon_link asins=’B01DDP7D6W,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3cdccdd1-cacd-11e8-999f-9b5336dca8b5′]

You might also like