खाऊ आणि पैशांचे आमिष दाखवुन केला लैंगिक अत्याचार

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाईन – खाऊ आणि पैशांचे आमिष दाखवत अंबरनाथ येथील एका रिक्षाचालकाने दोन अल्पवयीन मुलांना आनंद नगर येथील एमआयडिसी परिसरात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रिक्षाचालक चंद्रकांत पेडणेकर यास शिवाजी नगर पोलीसांनी अटक केली आहे.

ही दोन्ही अल्पवयीन मुले अंबरनाथ पूर्व भागातील शिवाजी नगर परिसरातील असून, रिक्षाचालक चंद्रकांत पेडणेकर देखील याच परिसरातील असून, ही दोन्ही मुले त्याच्या परिचयाची होती. त्यांना खाऊ आणि पैशांचे आमिष दाखवुन आंनद नगर एमआडिसी परिसरात रिक्षात बसवून नेले. तिथे दोघांवर लैंगिक अत्यार केला.

हा सारा घडलेला प्रकार घरी आल्यानंतर पालकांना सांगितला, त्यानंतर संतापलेल्या पालकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली, घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती पोलीसांना दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीसांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंर्तगत आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालक चंद्रकांत पेडणेकर यास अटक करण्यात आली आहे.

Loading...
You might also like