पिंपरी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाचे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी मध्ये घडला आहे . मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस आले.

या प्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. महेश गपाट (रा. मंजुबा वसाहत, चिंचवडेनगर, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश आणि पीडित मुलगी एकमेकांच्या ओळखीचे होते. ओळखीचा फायदा घेऊन त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. डिसेंबर २०१८ पासून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

दरम्यान, मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला असता, पीडितेच्या आईने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास चिंचवड पोलिस करत आहेत.