NSG ने इस्रायली दूतावासाशेजारील स्फोटाचा सुरू केला तपास , पोलिसांच्या हाती अद्याप ‘शून्य’च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात एनएसजीने सुरू केला आहे. एनएसजी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास करत आहेत. शुक्रवारी दूतावासाजवळ स्फोट झाला. सध्या अनेक सुरक्षा संस्था आणि पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, 12 तासापेक्षा जास्त वेळ लोटला तरी पोलिसांना मोठे यश मिळू शकलेले नाही.

शनिवारी सकाळी इस्त्रायली दूतावासाजवळ आयईडी स्फोट झालेल्या ठिकाणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने भेट दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पेशल सेलची टीम या स्फोटाचा तपास करीत आहे आणि त्यासंबंधी पुरावे गोळा करीत आहे. विशेष म्हणजे दिल्लीच्या लुटियन्स भागात औरंगजेब रोडवरील इस्त्रायली दूतावासाजवळ शुक्रवारी संध्याकाळी आयईडीचा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आयईडीमध्ये सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी स्फोट झाला. दिलासादायक म्हणजे या स्फोटात कोणतीही जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले नाही.

माहितीनुसार, स्फोटाच्या जागेवर तपासकांना इस्त्रायली दूतावासाचा पत्ता लिहिलेला एक लिफाफा सापडला. दरम्यान, त्यांनी लिफाफ्यात दिलेली टिप्पणी आणि त्यासंबंधित कोणतीही माहिती दिली नाही. राष्ट्रपती राम नाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम.वैकेन्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यापासून काही किलोमीटर अंतरावर प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाच्या वेळी ‘बीटिंग रिट्रीट’ कार्यक्रम चालू असताना स्फोट झाला. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी इस्त्राईलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्कनाज यांच्याशी या घटने संदर्भात दूरध्वनीवरून चर्चा केली आणि इस्राईलच्या एजंट व त्यांच्या मिशनला पूर्ण सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले.